आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्लीः शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या बिहारच्या नावाने ओरडतात त्याच बिहारने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. गरीब आणि मागासलेला म्हणून ओळखल्या जाणा-या बिहारने सलग दुस-या वर्षी देशातील सर्वाधिक विकासदर साधला आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचमध्येही नाही. महाराष्ट्राचा विकासदर 6.9 आहे.
बिहारने गेल्या वर्षी 14.8 टक्के विकासदर साधला होता. तर या वर्षांत महाराष्ट्राचा विकासदर बिहारपेक्षाही कमी होता. या वर्षांत महाराष्ट्राचा विकासदर 11.3 टक्के होता. तर यावर्षी बिहारने पुन्हा मुसंडी मारली आहे. मार्च 2012 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बिहारने 13.1 विकासदर नोंदविला. त्यानंतर दिल्ली, पुडुचेरी, छत्तीसगढ आणि गोवा यांनी क्रमांक लावला आहे. महाराष्ट्राचे स्थान त्यापेक्षाही खाली. आहे. पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा जीडीपी देशाच्या सरासरी जीडीपीपेक्षाही (6.5) कमी नोंदविण्यात आला आहे.
अशी आहे क्रमवारी
बिहार 13.1
दिल्ली 11.3
पुडुचेरी 11.0
छत्तीसगढ 10.8
गोवा 10.7
दरडोई उत्पन्नातही बिहारने बाजी मारली आहे. बिहारने सर्वाधिक 12 टक्के दरडोई उत्पन्नात वाढ नोंदविली आहे. त्या खालोखाल दिल्ली (9.3) आणि गोवा (9.3) ही राज्ये आहेत. विकासदर कमी असला तरी देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राचेच स्थान आहे. परंतु, इतर राज्यांनी असाच विकासदर राखला तर महाराष्ट्राचे स्थान डळमळीत होण्याचा धोका आहे.
जीडीपी 7 % झाला तर सेन्सेक्स येणार 14,500 वर !
देशाचा विकासदर यंदा ८ ते ९ टक्के राहील - राष्ट्रपती
महागाईतही ९ टक्के विकासदर शक्य: अहलुवालिया
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.