आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप व संघ तयार करतोय अतिरेकी : शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - भाजप आणि संघ परिवार अतिरेकी प्रशिक्षण कँप चालवून अतिरेकी तयार करत असल्याचा आरोप गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. हिंदू कट्टरपंथीयांना भाजप व संघ परिवार चिथावणी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसच्या बैठकीत शिंदे म्हणाले की, भाजप आणि संघाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये हिंदू दहशतवादाला खतपाणी घातले जाते. आम्हाला तशी माहिती मिळाली असून, त्यावर आमची करडी नजर आहे. यासंदर्भात आम्हाला सतर्क राहावे लागणार आहे. मालेगाव, मक्का मशीद आणि समझौता एक्स्प्रेस स्फोटांचा उल्लेखही गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.

दरम्यान, शिंदे यांनी एका राष्‍ट्रवादी संघटनेचा संबंध दहशतवादाशी लावला आहे. यासाठी सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.