आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leaders From UP Evasive On Modi As PM Candidate

नरेंद्र मोदींच्या नावावर होणार कुंभमेळ्यात शिक्कामोर्तब!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अलाहाबाद - सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत भाजपाकडून मोठी घोषणा होण्याचे संकेत विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी दिले आहे. 7 फेब्रुवारी रोजी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवण्याच्या मागणीवर संत समाजाकडून शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, 6 फेब्रुवारी रोजी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सिंघल म्हणाले की, ‘संत संमेलनात मोदींबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.’ यामुळे देशाच्या इतिहासच बदलून जाणार आहे. पहिल्यांदाच अख्ख्या देशातून एखाद्या नेत्यास पंतप्रधान करण्याची एकमुखी मागणी होत आहे. आतापर्यंत पंतप्रधान हे लादलेच गेलेले आहेत. मात्र, मोदींबाबत हे आपले वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण देण्यास सिंघल विसरले नाहीत.

मोदी सर्वात मोठे राष्ट्रवादी : नकवी - सिंघल यांच्या वक्तव्यानंतर लगेचच भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ‘मोदी हे सर्वात मोठे राष्ट्रवादी नेते आहेत.’ देशभरात त्यांचे अपील आहे. मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय योग्य वेळ आल्यानंतर केला जाईल. काही वेळेनंतर कलराज मिर्श यांनीही तोंड उघडले. ते म्हणाले, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून मोदी यांचे नाव अग्रक्रमावर आहे. सहा फेब्रुवारी रोजी राजनाथ कुंभमेळ्यासाठी जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

एनडीएमध्ये विरोधाची ठिणगी - मोदी यांच्या नावाच्या चर्चेला वेग येताच जदयूने आक्षेप नोंदवला आहे. आता काय संत समाज पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवणार काय? असा रोकडा सवाल पक्षाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे. ही लोकशाहीची चेष्टा आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले की, ज्या प्रकारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करून निवडणुका लढवल्या गेल्या होत्या, तसेच यावेळीही करण्यात येईल. मात्र अद्याप भाजपाकडून अधिकृत नावाची घोषणा झालेली नाही.

दबावाचे राजकारण : संत समाजात मोदींच्या नावावर एकमतामुळे भाजपावर दबाव येईल. याच महिन्यातील भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी यांचे नाव प्रस्तावित केले जाऊ शकते. पक्षाच्या कोअर ग्रुपने आधीच चर्चा केली असली तरी निर्णय मात्र अद्याप झालेला नाही.

मोदीही येणार - कुंभमेळ्यात 6 व 7 जानेवारीला होणार्‍या संत संमेलनात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यात नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.