आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देश आर्थिक संकटात; अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांचा धोक्याचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाची बिघडलेली आर्थिक स्थिती पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील युपीए आघाडी सरकारसाठी गळ्याचा फास बनत आहे.
त्यामुळेच युपीए सरकार चिंताग्रस्त आहे, आणि या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. त्यासाठीच पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्र्यांची एक बैठक बोलावली आहे. सोमवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही मनमोहनसिंगांनी देश मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्याचे म्हटले. इतरही काँग्रेसजनांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त केली.
देशाच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज विकासदरावरुनच लावता येऊ शकतो. देशाचा विकासदर ९ वरून ५.३ वर येऊन ठेपला आहे. सरकारच्या खर्चाचा मोठा हिस्सा कर्जाचे व्याज देण्यात, संरक्षण आणि सबसीडी यावर खर्च होतो. अशा परिस्थितीत देशाचा विकासदर खालावणारच असे म्हणणे आहे, फिक्कीचे अध्यक्ष आर.के.कनोरिया यांचे.
एकीकडे देशाची अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे विरोधीपक्षाने सरकारविरोधात मोर्चाच उघडला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, बिघडलेली आर्थिक स्थिती आणि युपीए सरकारमधील वाढता भ्रष्टाचार यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये हे सरकार घरी जाणार हे नक्की आहे. आपले म्हणणे पटवून दण्यासाठी त्यांनी दोन उदाहरणे दिली. ते म्हणाले, १९७५ मध्ये सुरु झालेल्या दुष्काळादरम्यान महागाई आणि भ्रष्टाचार वाढला होता. तेव्हा सत्ता परिवर्तन झाले. १९८७-८९ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हाही जनतेने सत्ता बदल घडवून आणला होता. आताची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, त्यामुळे सत्ता पालट नक्की आहे.
पंतप्रधानांवर निशाणा साधताना ते म्हणाले, अर्थतज्ज्ञ असूनही मनमोहनसिंग देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकलेले नाहीत. निर्णय घेण्यात आणि तयार केलेले धोरण अंमलात आणण्यात अपयश आल्यामुळे देशाच्या विकासाचा गळा या सरकारने घोटला आहे. उद्योजकांच्या यशस्वी धोरणामुळेच देशाची आर्थिक प्रगती झाली होती. विकासदर ९ पर्यंत पोहचाल होता. यात येथील उद्योगपतींचे योगदान मोठे होते. सतत खालवत चाललेली आर्थिक परिस्थिती आगामी काळात देशाची स्थिती कशी असेल याचेच संकेत आहेत.

मात्र, अजूनही आशा कायम !

रिझर्व्ह बँकेने सोमवारी व्याज दरामध्ये कपातीचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेचे सुबीर गोकर्ण म्हणाले, आर्थिक विकास दर खालावल्यामुळे आणि अंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे व्याज दरात कपात होऊ शकते. विकास दर खालावण्यामुळे त्याचा सरळ सरळ परिणाम महागाईवर पडू शकतो, त्यामुळे त्यात कपात होऊ शकते.
EXCLUSIVE: प्रणवदांवर पंतप्रधान नाराज, स्‍वतः घेणार अर्थमंत्रालयाचा ताबा
लोकशाहीची थट्टा करणा-यांना नाकारा - पंतप्रधान
रामदेवबाबा पंतप्रधान झाले तर...( अग्रलेख )