आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हिंदू दहशतवादावरील वक्तव्याच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात आंदोलन सुरु आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, भाजप संपूर्ण देश आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अशी परिस्थीती निर्माण करेल की, सुशीलकुमार शिंदेंना खुर्ची सोडावीच लागेल. ते म्हणाले, हा केवळ शाब्दीक आणि प्रतिकात्मक विरोध नाही तर, याचा निश्चित परिणाम पाहायला मिळेल.
शिंदेंच्या वक्तव्यावर पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्षा शांत का आहेत, असा सवाल राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला. (वाचा, भाजपची सत्ता आल्यावर कुठे जाल? गडकरींचा प्राप्तीकर विभागाला धमकीवजा इशारा) पंतप्रधानांच्या शांत स्वभावावर टीका करताना ते म्हणाले, मनमोहनसिंग एखाद्या मुद्यावर बोलण्यासाठी एक आठवडा किंवा एक महिना देखील घेतात. मात्र, छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणा-या काँग्रेस अध्यक्षाही आता का शांत आहेत? का, त्यांना फक्त मतपेटीचे राजकारण करायचे आहे. सोनिया गांधींची परवानगी नसेल तर पंतप्रधान काहीही करणार नाहीत, त्यामुळे या प्रकरणात भाजपला सोनियांकडूनच उत्तर हवे आहे. युपीए सरकारमधील मंत्री ओबामा आणि हाफिज सईद यांना आदरार्थी बोलतात. एवढेच नाही तर ते त्यांचा उल्लेख 'श्रीमान' आणि 'साहेब' असा करतात, आता तर गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा खालावली आहे. पाकिस्तानही आता भारत दहशतवादी राष्ट्र असल्याचे म्हणत आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, भाजपला सत्तेत येण्याची किंवा विरोधी बाकांवर बसण्याची चिंता नाही. आम्ही केवळ सत्ते साठी नाही तर, देश आणि समाजासाठी राजकारण करतो. राष्ट्रवादाची भावना कोणामध्येच दुही निर्माण करत नाही. भाजप कोणत्याही धर्माबद्दल किंवा त्याल मानणा-यांमध्ये भेदभाव केला नाही. काँग्रेसच्या चिंतन शिबीरावर निशाणा साधताना ते म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या चिंतन शिबीरात देशाच्या समस्यांवर चर्चा होते. त्या कशा सोडविता येतील याबद्दल मंथन होते. मात्र, काँग्रेसच्या शिबीरात असे काहीच झाले नाही. त्यांनी देशाला भ्रष्टाचार, दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, नक्षलवाद आणि महागाईच्या संकटात लोटले आहे. यावर चर्चा करायचे सोडून काँग्रेसने जावाई शोध लावला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये दहशतवादचे प्रशिक्षण दिले जाते. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण देशातून राग व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.