आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Upset About Advani's Seating At Rashtrapati Bhavan

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणींच्या 'अवमान', भाजप नाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राष्ट्रपतीभवन येथे आयोजित 'अ‍ॅट होम' कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार सर्व गोष्टी पार पडल्या, परंतु राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यालयाकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चा केली असून भविष्यात अशाप्रकारे प्रोटोकॉलचे उल्लंघन केले जाणार नाही असे सांगितले आहे. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीभवनात इथून पुढे अशाप्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणींचा 'अवमान', भाजप नाराज
स्वातंत्र्यदिनानिमीत्त बुधावारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे आयोजित भोजन कार्यक्रमात अडवाणींसह वरिष्ठ नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना व्हिआयपी रांगेबाहेर ठेवण्यात आले होते. भाजपचे वरिष्ठ नेते आणि इतर निमंत्रीत एकत्रीत उभे होते तर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राष्ट्रपती मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या बाजूची खुर्ची देण्यात आली होती. कॅबिनेट मंत्र्यांनाही अशी जागा मिळाली होती की ते राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत थेट बोलु शकत होते.
संपूर्ण कार्यक्रमात भाजप नेत्यांना उभे राहावे लागले. एकाच आठवड्यात राष्ट्रपतीभवनात अडवाणींसोबत असे वागण्याची ही दुसरी घटना आहे.
मागील आठवड्यात ११ ऑगस्टला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या शपथविधी समारंभातही अडवाणीसारख्या ज्येष्ठ नेत्याला चौथ्या रांगेत बसविण्यात आले होते.
भाजप नेते राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबद्दलची तक्रार करणार आहेत. राष्ट्रपतीभवनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, समारंभात सर्व औपचारिकतेची काळजी घेण्यात आली होती. मुखर्जींनी अडवाणींसोबत चर्चाही केली होती.
ममता बॅनर्जींनी केले परंपरेचे उल्लंघन; मणिपूर साखळी स्फोटांनी हादरले
नरेंद्र मोदींएवढी बदनामी कोणाची झाली नाही- लालकृष्ण अडवाणी
साक्षात्कारी अडवाणी (अग्रलेख)
पक्षवाढीसाठी आणखी मेहनत घेण्याचे आवाहन - अडवाणी