आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियाच्‍या छायाचित्रावर काळे फेकण्‍यावरुन राजकारण; अण्‍णांनीही केला निषेध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः योगगुरु बाबा रामदेव यांच्‍यावर काळी शाई फेकण्‍याची घटना ताजी असतनाच आज कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी यांच्‍या छायाचित्रावर काळा रंग फेकण्‍यात आला. कॉंग्रेसच्‍या मुख्‍यालयाबाहेर असलेल्‍या फलकावरच रंग फेकण्‍यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमारे अर्धा तासाच्‍या गोंधळानंतर फलक पुसण्‍यात आला.
या घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्‍या आहेत. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी या प्रकारामागे रामदेव बाबा आणि भाजपचे षडयंत्र असल्‍याचा आरोप केला आहे. याशिवाय कॉंग्रेसच्‍या इतर नेत्‍यांनीही सिंह यांचीच री ओढली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जनतेचे लक्ष विचलित करण्‍यासाठी भाजपने ही खेळी खेळल्‍याचे कॉंग्रेस नेत्‍यांनी म्‍हटले आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी या घटनेचा निषेध करतानाच युपीची जनताच याचे उत्तर देईल, अशी प्रतिक्रीया दिली. तर भाजपचे प्रवक्ते बलबीर पुंज यांनी या घटनेचा निषेध केला. हा प्रकार म्‍हणजे पब्लिसिटी स्‍टंट असू शकतो, असे ते म्‍हणाले. दिग्विजय सिंह यांच्‍या वक्तव्‍यानंतर भाजपने तीव्र नाराजी व्‍यक्त केली. राजकारण करण्‍याऐवजी कॉंग्रेसने या प्रकरणाचा तपास करुन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे भाजपने म्‍हटले आहे.
ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. राळेगणसिद्धी येथून प्रतिक्रीया देताना त्‍यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्‍या फलकावर काळे फेकण्‍याचा प्रकार लोकशाहीसाठी चांगला नाही. आम्‍ही याचा तीव्र शब्‍दात निषेध करतो.
कॉंग्रेसचे मुख्‍यालय 24, अकबर रोड येथे आहे. एका व्‍यक्तीने बाहेरच्‍या फलकावर असलेल्‍या सोनिया गांधींच्‍या छायाचित्रावर काळे फेकले. कॉंग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍याला पकडून चोप दिला. एकीकडे हा व्‍यक्ती रामदेव बाबांचा समर्थक असल्‍याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भगतसिंग क्रांती सेनाने या घटनेची जबाबदारी स्‍वीकारली आहे. या व्‍यक्तीचे नाव त्रिभुवन सिंह असे सांगण्‍यात आले आहे. मी काही आयएसआय एजंट नसून काळे फेकल्‍यानंतर 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्‍याचे तो सांगतो.
रामदेव बाबांचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी मात्र हा व्‍यक्ती रामदेवबाबांचा समर्थक असल्‍याचे नाकारले आहे. कॉंग्रेस मुख्‍यालयाबाहेर काही कार्यकर्त्‍यांनी निदर्शने केली. ही मंडळी रामदेव बाबांचे समर्थक नसल्‍याचे तिजारावाला यांनी म्‍हटले आहे. या संपूर्ण घटनाक्रमामागे एक फार मोठे षडयंत्र असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
निवडणुकीचे वातावरण असल्‍यामुळे कॉंग्रेस मुख्‍यालयाबाहेर बरीच गर्दी होती. अचानक एका व्‍यक्तीने बाहेर असलेल्‍या फलकावरील छायाचित्रावर काळे फेकले. हा व्‍यक्ती 40 ते 45 वयोगाटाचा असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. कार्यकर्त्‍यांनी त्‍याची बेदम मारहाण केली. परंतु, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आणून त्‍याला ताब्‍यात घेतले.
'काळे फेकणा-याने केला होता अण्णा आणि भाजपचा प्रचार'
छायाचित्रांतून पाहा - रामदेव बाबांवर कुणी टाकली शाई ?
रामदेव बाबा यांच्या तोंडावर काळं फेकलं