आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blouse Costing 6 Crore Rupees Which Made Of Diamonds

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा कोटी रुपयांचे ब्लाऊज पाहण्यासाठी आल्या शेकडो महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर (पंजाब)- होशियारपूर येथील एका प्रदर्शनात ठेवलेले सहा कोटी रुपयांचे ब्लाऊज पाहण्यासाठी शेकडो महिला, त्यांचे पती आणि कुटुंबीयांची गर्दी उसळत आहे. ज्वेलरी रिटेल चेन औराने एका हॉटेलमधील प्रदर्शनात इतर दागदागिन्यांसह हे कोटीमोलाचे ब्लाऊजही ठेवले आहे.
कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू असलेल्या या प्रदर्शनात सुरक्षा रक्षकांसह साध्या कपड्यातील सुरक्षा कर्मचारीही या किमती ब्लाऊजच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्हीद्वारेही लोकांवर नजर ठेवली जात आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणा-या प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न असतो की, ते सहा कोटी रुपयांचे ब्लाऊज कोठे आहे? ब्लाऊज पाहण्यासाठी महिलांच्या रांगा सकाळपासूनच लागतात. सहा कोटी रुपयांच्या हि-यांचे हे ब्लाऊज पाहून महिला अधिकारी महिंदर कौर आणि त्यांच्या कुटुंबातील विज्ञानाच्या प्राध्यापिका कमलजित कौर कंपनीच्या कर्मचा-यांना वारंवार विचारत होत्या की, असे चमचमणारे ब्लाऊज तयार करण्यासाठी किती दिवस लागले आणि कारागीर कुठून आणले होते? एका प्रशासकीय अधिका-याची पत्नी शोभा यांनी विचारले की, इतके महागडे ब्लाऊज होशियारपूरमध्ये कशासाठी आणले आहे?

ब्लाऊज पाहण्यासाठी, विकण्यासाठी नाही
औरा कंपनीचे व्यवस्थापक संदीपसिंह यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, मागील वर्षी होशियारपूरमध्ये भरवलेल्या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाल्याने या वेळी पाचशे हि-यांचे सहा कोटी रुपयांचे ब्लाऊज दाखवण्याचे कंपनीने ठरवले. 10 लाख युरोच्या हि-यांनी तयार केलेल्या या ब्लाऊजची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे सहा कोटी आहे. हे ब्लाऊज विक्रीसाठी नाही, तर फक्त पाहण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 500 कॅरेटचे हिरे वापरून तयार केलेले हे ब्लाऊज इंटरनॅशनल सेंटरने तयार केले आहे. युरोपियन देशांत भरवल्या जाणा-या प्रदर्शनातच हे मौल्यवान ब्लाऊज लोकांना दाखवण्यासाठी ठेवले जाते.