आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळे घड्याळ मुलींसाठी ठरणार सुरक्षाकवच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्याने तयार केलेले घड्याळ मुलींसाठी सुरक्षाकवच ठरू शकते. मल्टियुजर, अत्याचारविरोधी उपकरण मुलींसाठी केवळ सुरक्षात्मक उपाय ठरू नाही तर ते आरोपीला पुराव्यानिशी पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यास भाग पाडू शकेल. मनू चोप्रा या विद्यार्थ्याचे हे संशोधन आहे.

जवळपास दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मनूने घड्याळासारखे निळे उपकरण तयार केले आहे. हे तंत्रज्ञान मुलींच्या नर्व्हस सिस्टिमवर काम करेल. उपकरण नाडीच्या ठोक्याच्या गतीनुसार सक्रिय होते. तसेच ते व्हाइस कमांड मिळाल्यानंतर हल्लेखोराला विजेचा झटका देण्यास सुरुवात करते. एवढेच नव्हे तर घड्याळाकडून घटनेचे चित्रण विनाअडथळा केले जाते. यातील एसओएस मेसेज आणि जीपीएस तंत्राच्या मदतीने नजीकचे पोलिस ठाणे आणि पीडिताच्या निकटवर्तीयांपर्यंत धोक्याचा इशारा दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे ते घटना घडलेल्या ठिकाणाची माहिती देऊ शकेल.

कसे काम करते :
संकटाच्या स्थितीत कोणत्याही व्यक्तीच्या नाडीचे ठोके 119 पर्यंत पोहोचतात. अशा स्थितीत निळ्या रंगाचे उपकरण सक्रिय होते. त्यानंतर व्हाइस कमांड ‘अ‍ॅक्टिव्हेट’ होताच त्यावरील अँड्रॉइड लॉक स्क्रीनवर ते ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाल्याची माहिती देते आणि हल्लेखोराला अस्थायी रूपात आठ अ‍ॅम्पियरचा विजेचा झटका देते. त्यावर लावलेले कॅमेरे अ‍ॅक्टिव्हेट होतात आणि विना अडथळा प्रत्येक कोनातून हल्लेखोराची छायाचित्रे काढली जातात.

संशोधकाचे म्हणणे
रोहणी येथील जी. डी. गोयंका पब्लिक स्कूलमध्ये मनू चोप्रा बारावीच्या वर्गात शिकत आहे. मनू म्हणाला की, राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि वृत्तपत्रांमध्ये दररोज येणा-या बातम्यांमुळे मला छोट्या बहिणीच्या सुरक्षेची चिंता भेडसावत होती. यातून सुरक्षा उपकरण बनवण्याची प्रेरणा मिळाल्यामुळे ही निर्मिती झाली. राजधानीतील महिलांना या उपकरणाचा उपयोग होऊ शकतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याचे मनूने सांगितले.