आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bodoland Territorial Council (btc) Chief Hagrama Mohilary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वय 39, दहावी पास, रुबाब मुख्यमंत्र्यांसारखा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे आहेत हागरामा मोहिलारी. वय 39 वर्षे. दहावी पास. बोडो प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष. रुबाब मात्र मुख्यमंत्र्यांसारखा. पुढे-मागे आसाम पोलिसांनी भरलेल्या दहा गाड्यांचा ताफा. मोहिलारी बोडो लिबरेशन टायगर्सचे प्रमुख कमांडर होते. म्हणून तर हा थाट. 1993 पासून 2003 पर्यंत आसाममध्ये झालेल्या बहुतांश बॉम्बस्फोट आणि हिंसक घटनांमागे त्यांचाच हात आहे. विविध न्यायालयांत त्यांच्याविरुद्ध कमीत कमी दोन डझनपेक्षाही जास्त खटले सुरू आहेत.
2003 मध्ये बोडो करारानंतर टायगर्सनी शरणागती पत्करली अन् मोस्ट वाँटेड अतिरेकी हागरामा मोहिलारी रातोरात या परिसराचे सर्वात मोठे नेते बनले. परिषदेचे अध्यक्ष बनले. पक्षही काढला. बोडो पीपल्स फ्रंट. 2006 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 12 जागांवर विजय मिळवला. बहुमताने विजयी होण्यात अपयशी ठरलेली काँग्रेस मोहिलारींच्या मदतीनेच सरकार बनवू शकली. बोडो त्यांना देवासमान मानतात. ते प्रत्येकाला उदार हस्ते मदत करतात. मात्र मुस्लिमांचे ते सर्वात मोठे शत्रू आहेत. गेल्या दहा दिवसांपासून आसाममध्ये सुरू असलेल्या दंग्यांमागे मोहिलारीचाच हात असल्याची चर्चा आहे. ऑल बोडो मायनॉरिटीज स्टुडंट्स युनियनचे सचिव खालिद उल इस्लाम सांगतात की, बोडो परिषदेच्या परिसरातून सर्व मुस्लिमांना हाकलून द्यायची मोहिलारींची
इच्छा आहे. बहुतांश बोडो टायगर्सनी शस्त्रे खाली ठेवली नव्हती. त्यांचाच उपयोग दंग्यांमध्ये केला जात आहे.
मोहिलारी खूप कमी बोलतात. त्यापेक्षाही कमी हसतात. जास्तीत जास्त वेळ स्वत:च्या गॅलेक्झी एस टू मोबाइलवर घालवतात. वेळ मिळाला तरी नजर खालीच असते. वर पाहतात तेव्हा अजूनही लोक चळचळ कापतात. त्यांनी गोसाईगावात बोडो शरणार्थी शिबिराला भेट दिली. आरोपांविषयी काही बोलत नाहीत. फक्त एवढे बोलतात की, बोडो करारानुसार 2003 नंतर आपल्या परिसरात मुस्लिमांना राहू दिले जाणार नाही. उपेक्षा आणि दुर्लक्षाच्या कात्रीत सापडलेल्या संपूर्ण बोडो परिसरात बॅनर आणि पोस्टर्सचे पिक आले आहे.
बीएसएफच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप - चहुबाजूंना खाकी वर्दी. कमीत कमी 100 सुरक्षा रक्षक. बहुतांश शस्त्रधारी.काही कॅरम किंवा बुद्धिबळ खेळणारे. पोलिस कोणते आणि बोडो टायगर्स कोण? कुणालाच सांगता येत नाही. विचारण्याची कुणाची हिंमतही होत नाही. स्थानिक पत्रकार आणि बोडो कार्यकर्त्यांमधील मतभेद नष्ट झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार श्रीमंत दाइमारी बोडो पीपल्स फ्रंटचे प्रवक्ते आहेत.
शरद गुप्ता. गोसाईगाव (कोक्राझार)