आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक बॉलीवूड कलाकार करतात शेती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेते अभिनयासोबत अन्य मंचावरही कष्ट उपसत आहेत. पुण्यानजीकच्या एका गावात नाना पाटेकर यांची अनेक एकर शेती आहे. नाना यांनी धान शेतीसोबत फळबागाची लागवड केली आहे. केवळ चित्रीकरणासाठी मुंबईला जाणारे नाना बहुतांश वेळ शेतात घालवतात. चांगला मूड असेल तर लुंगी आणि बनियनवर ते शेतासमोर भाजी विकायला बसतात. शेतीविषयी जिव्हाळा निर्माण होण्याचे श्रेय नाना दिवंगत अभिनेते निळू फुले यांना देतात.
ज्या अभिनेत्यांना मुळात शेतीची आवड आहे, अशांमध्ये नानाचा समावेश आहे. या अभिनेत्यांत धर्मेंद्र, अशोककुमार, राज कपूर आणि राजकुमार यांचा समावेश आहे. या कुटुंबाच्या नावावर शेकडो एकर शेती आहे. धर्मेंद्र यांची लोणावळा येथे अनेक एकर शेती आहे. याव्यतिरिक्त पुण्यानजीक त्यांची 100 एकर शेती हेमामालिनी आणि दोन मुलींच्या नावावर आहे. धर्मेंद्र यांची उत्तराखंडमध्येही अनेक एकर शेती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. धर्मेंद्र यांच्या शेतातील पवना धरणापासून जवळपास 12 कि.मी. अंतरावर अशोककुमार यांची शेती व फार्महाऊस आहे. शेती त्यांच्या मुलीच्या नावावर आहे. रियल इस्टेट एजंट आणि तनू वेड्स मनूचे निर्माते विनोद बच्चन म्हणाले की, बॉलीवूड स्टार सुरुवातीपासूनच शेती खरेदी करण्याला पसंती देतात. धर्मेंद्र बहुतांश वेळ लोणावळा येथील शेतात घालवतात.
कारण काहीही असो, शहरातील गर्दीपासून दूर जात निवांतपणा अनुभवण्यासाठी नव्या पिढीतील कलाकारांचाही शेती खरेदी करण्याकडे कल आहे. संजय दत्तने नुकतेच फार्महाऊस बनवले आहे. लोणावळ्यानजीक कुनेगावमध्ये सुनील शेट्टीने नुकताच बंगला बांधला आहे. अभिनेता आमिर खानने 11 एकर तर गायक सोनू निगमने 10 एकर शेती या भागात खरेदी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार, शेती खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलीपकुमारपासून तनुजा, नीलम, सुनील शेट्टी, सुरेश ओबेराय आदी कलाकारांनी त्यासंबंधीत दस्तऐवज सोपविले आहेत.
महाराष्ट्रात शेती घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकीत शेती असल्याचा दाखला दिला होता. मात्र मुलायम सिंह सरकार गेल्यानंतर मायावती यांनी बाराबंकीचा करार रद्द केला. सलमान खान आणि अजय देवगणने पनवेलमध्ये तर चंकी पांडे, राजेश खन्ना, नीलम, सुरेश ओबेरॉय यासारख्या अभिनेत्यांनी लोणावळ्याजवळ शेती घेतली आहे.
अनेक कलाकारांचे निकटवर्ती राहिलेले पीटर जॉन म्हणाले की, पुण्यानजीक राज कपूर यांची शेती राजबाग सर्वात प्रसिद्ध असून त्याचे आता संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. राज कपूर यांनी अनेक चित्रपटांच्या कथा आणि पटकथा येथे लिहिल्या. लोणावळा, खंडाळा, पनवेल, मावळ या परिसरात सध्या 50 लाख रुपये प्रतिएकर भावाने जमीन विक्री होत असल्याचे विनोद बच्चन म्हणाले.