आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Datta, Present On Underworld Don Daud Ibrahim Denar Party At Dubai

संजय दत्त होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डिनर पार्टीत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमतर्फे दुबईत आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त गेला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्टीला संजय दत्तसोबत दोन चित्रपट निर्मातेही होते. परंतु, संजयचा दाऊदशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्याचे वकील हरीश साळवे यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टात संजय दत्तचे वकील हरीश साळवे यांनी न्यायमूर्ती पी.सतशिवम आणि बीएस चव्हाण यांना ही माहिती दिली. परंतु, दाऊद आणि टायगर मेमन यांच्याशी संजय दत्तचा कोणताही संबंध नसल्याचे अ‍ॅड.साळवे यांनी सांगितले. मुंबई हल्ल्यात मेमन हा प्रमुख सुत्रधार होता. दाऊद इब्राहिमशी संबंध केवळ चित्रपटाच्या शूटिंगपुरताच असल्याचे अ‍ॅड. साळवे यांनी कोर्टाला सांगितले.
मुंबईत 1993मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपींना देण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्‍यात आलेल्या याचिकेवर सुनावरणी सुरू आहे. या प्रकरणी 12 आरोपींना मृत्यूदंड तर 78 आरोपींना कारावासाशी शिक्षा सुनावण्यात आली होती.
संजय दत्त याची टाडा न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. तर मुंबई न्यायालयाने बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याने संजयला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तची निर्दोष सुटका झाली होती. त्याविरुद्ध अपील न करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता.
चित्रपटांमध्ये पळपुटा देशद्रोहीच्या रुपात दाखवल्यामुळे चिडला दाऊद!
अक्षय आता 'दाऊद इब्राहिम' तर इम्रान खान होणार 'असलम'
दाऊद गँगचा पांडे लढणार दहशतवाद, भ्रष्टाचाराविरुद्ध !