आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Border Security Force (bsf) Kill To The Bangladesh Parson

बांगलादेशी नागरिकाची नग्न करून केली हत्या; व्हिडिओही बनवला!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहरामपुर: बांगलादेशच्या एका नागरिकाला सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) आठ जवानांनी नग्न करून त्याची हत्या केल्याच्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओची दखल घेत त्या आठ जवानांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
बांगलादेशातील नवाबगंज येथील सलीम शेख याला गाईंची तस्करी करताना पद्मा नदीवर बीएसएफच्या जवानांनी अटक केली. त्यानंतर त्याला विवस्त्र करून बेदम मारहाण केली की, त्यात या नागरिकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या नागरिकाला मारताना एका जवानाने आपल्या मोबाईलवर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. नंतर त्या नागरिकाचा मृतदेह जवानांनी बांगलादेशाच्या सीमेवर फेकून दिला होता.
घटनेनंतर बीएसएफचा एक जवान एका मोबाईल दुकानावर रिंगटोन डाऊनलोड करण्यासाठी गेला असता, बांगलादेशी नागरिकावर जवानांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ त्या दुकानदाराच्या निदर्शनास आला. या दुकानदाराने तो व्हिडिओ कॉपी करून त्याच्या सीडीज् पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेकडे वितरित केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेहरामपूर येथे ही घटना आहे. व्हिडिओची दखल घेत सीमा सुरक्षा दलातील त्या आठ जवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.