आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची शान नेपाळच्या पाच बॉक्सर भगिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - भारतात जन्मलेल्या आणि मूळ नेपाळच्या असलेल्या पाच बॉक्सर बहिणींची ही यशोगाथा. एकाच कुटुंबातील तीन भावांच्या पाच मुलींनी बॉक्सिंगच्या क्षेत्रात भारताचे नाव मोठे केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही आपला छंद जोपासून या बहिणी कुटुंबाचा आधार बनल्या आहेत.
घरात पैशांची चणचण
तन्वी, वैशाली, सुरभी, नैना आणि सोनाली या पाचही बहिणींची पंच मारण्याची शैली व्यावसायिक आहे. त्यांचा निर्धारही पक्का आहे; पण बॉक्सिंगसाठी आवश्यक सामग्री नसल्यामुळे त्यांनी हे सामान त्यांनी भाड्याने घेतले आहे. योग्य आहाराचीही मारामार असते. बॉक्सिंगच्या खेळाडूला दररोज 2 लिटर दूध, पनीर, फळे, हिरव्या भाज्या आदी गोष्टी समाविष्ट असलेला आहार घ्यावा लागतो. एका खेळाडूला रोज आहारासाठी 150 ते 200 रुपये लागतात. कुटुंबप्रमुख राजेंद्रकुमार अनेक वर्षांपूर्वी भारतात स्थायिक झाले आहेत.
बॉक्सिंग रिंगमध्येच जगणे शिकले
अमृतसरमधील छेहर्टा गावात जन्मलेल्या या बहिणी लहानपणी बाहुलीसोबत खेळण्याऐवजी बॉक्सिंग रिंगमध्ये चालणे शिकल्या. कुटुंबप्रमुख राजेंद्र कुमार कित्येक वर्षांपूर्वी नेपाळमधून भारतात वास्तव्यास आले. मोलमजुरी करून ते कुटुंबाची गुजराण करतात.
मोठी मुलगी- तन्वी , बीए-2 ला आहे. तिने बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गोल्ड मेडल जिंकले आहे. तसेच अनेक रौप्य आणि कांस्यपदके मिळवली आहेत.
दुसरी मुलगी- वैशाली. हिनेही ज्युनियर व सिनियर गटात गोल्ड मिळाले आहे.
तिसरी मुलगी- सुरभी. हिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
चौथी मुलगी- नैना. बॉक्सिंगमध्ये तरबेज आहे. तिने अनेकदा ज्युनियर आणि सिनियर गटात गोल्ड मेडल मिळवले आहे. शहीद भगतसिंग स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्येही ती विजयी ठरली आहे.
पाचवी मुलगी- सर्वात छोटी सोनाली ही देखील राज्यस्तरीय बॉक्सिंगच्या स्पर्धेत सुवर्णपद विजेती ठरली आहे.