Home »National »Delhi» Brahmos Launch,34 Sucessful Test

ब्रह्मोस पुन्हा झेपावले,34 वी यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था | Jan 10, 2013, 05:44 AM IST

  • ब्रह्मोस पुन्हा झेपावले,34 वी यशस्वी चाचणी

नवी दिल्ली -बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम किनारपट्टीवर लढाऊ जहाजावरून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी बुधवारी यशस्वी घेण्यात आली. 290 कि.मी. पल्ल्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सकाळी 9.30 वाजता निर्धारित जहाजाचे लक्ष्य यशस्वीरीत्या भेदले, अशी माहिती ब्रह्मोस एरोस्पेसचे सीईओ ए. सिवथानू पिल्लई यांनी दिली.

अरबी समुद्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये आयएनएस तेग जहाजावरून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली वापरण्याजोगी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतरची ही 34 वी चाचणी आहे. भारतीय नौदलात 2005 मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आली. ब्रह्मोस अमेरिकन जीपीएस तसेच रशियाच्या जीएलओएनएएसएस उपग्रह प्रणालीपासून माहिती मिळवण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्राच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीत अचूक लक्ष्य भेदण्यावर भर देण्यात आला होता.

Next Article

Recommended