आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरप्रदेश : बहुजन समाज पक्षाच्या आमदारांकडून सभागृहाची मर्यादा पायदळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये राज्यपालांनी अभिभाषणाला प्रारंभ केल्या बरोबर बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यांनी केवळ गोंधळ घालून राज्यपालांचे अभिभाषण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर, त्यांच्यावर कागदांचे बोळे फेकून सभागृहाची मर्यादाच पायदळी तुडविली. बसप आमदारांनी राज्य सरकारच्या निर्णयांबरोबरच कुंभमेळ्यातील दुर्घटनेवरुन सरकारचा निषेध केला. बसपने अखिलेश यादव सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध केला.

संसदीय कार्यमंत्री आजम खान विरोधी आमदारांवार ओरडताना दिसत होते. ते म्हणत होते, बसपच्या गुंडाचे सरकार आता राहिलेले नाही. ज्येष्ठ मंत्री चौधरी म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार गोंधळ होणार याची आम्हाला पूर्व कल्पना होती. त्यामुळे विरोधीपक्षाच्या आक्रमकतेचे जराही आश्चर्य वाटत नाही. आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार होतो. केवळ विरोधाला विरोध हे धोरण मात्र, योग्य नाही.

प्रमुख विरोधीपक्ष बसपने राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, ऊस उत्पादक शेतक-यांची बाकी राहिलेली बिले आणि धान्य खरेदीतील अनियमीतता यावरुन सरकारला लक्ष्य केले तर भाजप, काँग्रेस, रालोद यांनीही याच मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अलाहाबाद येथील चेंगराचेंगरी देखील प्रमुख मुद्दा होता.