आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पादत्राणांवर बुद्धाच्या चित्राने वादंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाश्चिमात्य देशात पुन्हा एकदा धार्मिक प्रतिकांच्या अपमानाचे प्रकरण समोर आले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या एका कंपनीने भगवान बुद्धांचे चित्र असलेली पादत्राणे बाजारात आणली आहेत. कंपनीच्या या कृतीवर तिबेटी आणि बौद्ध समुदायाने संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
तिबेटी आणि बौद्ध समुदायाने पादत्राणे बनविणारी कंपनी आयकॅनला पत्र पाठवून विरोध दर्शविला आहे.
तसेच बौद्ध समुदायाने कंपनीच्या फेसबुक अकांऊटवर विरोधाचे अनेक संदेश पोस्ट केले आहेत. इंटरनॅशनल कँपेन फॉर तिबेटशी संबंधीत भूचूंग सेरिंगने लिहिले आहे की, बौद्ध परंपरा आणि बौद्ध प्रतिकांना अतिशय सन्मान आहे. पवित्र भावनेने त्यांच्याकडे बघीतले जाते. कंपनीचे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. तुम्ही याकडे लक्ष देऊन तुमच्या कॅटलॉगमधून या चप्पल बाजूला काढणार की नाही ?
तिबेटी संसदेचे उत्तर अमेरिकी सदस्य ताशी नामग्याल यांनी आयकॅन कंपनीला पत्र पाठवून निषेध व्यक्त केला आहे. नामग्याल यांनी पत्रात लिहिले आहे की, 'आपल्या कंपनीच्या पादत्राणांना पाहिल्यानंतर मला धक्काच बसला की, एवढी असंवेदनशीलता कशी असू शकेते ? भगवान बुद्ध केवळ आशियातच नाही तर जगभर पुज्यनीय आहेत. त्यामुळेच तुम्हाला अपिल करण्यात येते की ती सर्व पादत्राणे तुम्ही बाजारातून परत घ्या, ज्यांच्यावर भगवान बुद्धांचे चित्र आहे. तसेच तुमच्या वेबसाईटवर या घाणेरड्या कृत्याबद्दल माफी मागा.
स्वस्तिक चिन्ह झळकवल्याने वादंग
‘भारत माता की जय’वरून वादंग; गायकाला धमक्या
ममतांच्या आणखी एका कार्टूनमुळे वादंग