आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतिश कुमारांच्या जनता दरबारात जिवंत काडतुसे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारांच्या 'जनता दरबारात' पोलिसांनी एकाला सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. हितेश असे आरोपीचे नाव आहे. जनता दरबारात हितेश उपस्थित होता.
हितेशच्या कारमधून पिस्तूलही पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त करण्‍यात आलेली पिस्तूल हितेशची आहे की नाही, याचा पोलिस तपास करत आहे.
नीतिश कुमारांकडे आठवड्याच्या सोमवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. यात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात. सर्वाची प्रवेशद्वारावरच तपासणी करण्यात येते. परंतु कडक तपासणीनंतरही हितेश जिवंत काडतुसे जनता दरबारात घेऊन कसा गेला असावा, असा प्रश्न पोलिसांसह सगळ्याना पडला आहे.
बिहार भाजपला भगदाड! आता ताराकांत झा यांनी सोडला पक्ष