आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus ,truck,lauxary Vechiles Gets Diseal On Petrol Pamp

बस, ट्रक, लक्झरी गाड्यांना पेट्रोल पंपांवर बाजारभावानेच डिझेल मिळणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिझेलच्या घाऊक तसेच किरकोळ विक्रीचे नियम अधिक स्पष्ट करण्यात येतील. यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार सुरू केला आहे. यानुसार बस, ट्रक आणि लक्झरी गाड्यांना पेट्रोल पंपांवर बाजारभावानेच डिझेल देण्याचा नियम लागू केला जाऊ शकतो. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी ही माहिती दिली. घाऊक आणि किरकोळ डिझेल विक्रीवरून प्रत्येक राज्यात वाद निर्माण झाले आहेत. जे लोक नेहमी घाऊक दराने डिझेलची खरेदी करत होते त्यातील काही जण आता सरळ किरकोळ विक्रीच्या दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे नियम अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच नियम बदलण्याचा विचार सरकार करत आहे. जेणेकरून किरकोळ आणि घाऊक विक्रीचा हा वादच संपुष्टात यावा आणि काळाबाजारही थांबेल. घाऊक आणि किरकोळ डिझेल विक्रीसाठी नियम निश्चित करण्याची तयारी केंद्र सरकारचीच असल्याचे मत यापूर्वी अनेक राज्ये तसेच पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनने व्यक्त केले होते. विद्यमान नियमांनुसार किरकोळ आणि घाऊक विक्रीच्या डिझेलमध्ये नेमका फरक कसा करायचा तेच स्पष्ट नाही.

मोईली म्हणाले, दोन वेगवेगळ्या दरांमुळे काही लोकांना फटका सहन करावा लागत आहे, हे मान्य आहे. यात मच्छिमारही आहेत. म्हणूनच त्यांना काही प्रमाणात सवलत दिली आहे. अशा चुकांमुळे कोणाचे नुकसान होत असेल तर त्यांना दिलासा देण्यासाठी नियमांबाबत विचार केला जाईल.

इंडियन ऑईलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. एस. बुटोला म्हणाले, डिझेलच्या दोन दरांमुळे काळ्या बाजाराची अधिक शक्यता आहे. तो थांबावा म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. पूर्वी एकाच दराने सर्वांना डिझेल मिळायचे. नव्या व्यवस्थेतील उणिवांचा आढावा घेतला जाईल. त्याच दृष्टीने उपाय सुचवले जातील.

रोज 5 कोटींना फटका
17 दिवसांपूर्वी दोन दरांची घोषणा झाली.
560 कोटी कंपन्यांची ठोक दरवाढीमुळे कमाई.
85 कोटी तोटा झाला, कारण, घाऊक ग्राहकांची किरकोळ दराने खरेदी. रोज 5 कोटींना फटका.