आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • C Rangrajan Asks To Increase Gas And Diesel Prices

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेल-गॅसचे दर लगेच वाढवा: सी. रंगराजन यांचा सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तातडीने वाढवण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी म्हटले आहे. सरकारी खर्च नियंत्रणासाठी हे पाऊल गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे.
सरकार देत असलेली सबसिडी नियंत्रणात ठेवणे आणि सरकारी तिजोरीची तूट भरून काढण्यासाठी ही भाववाढ आवश्यक असल्याचे रंगराजन यांना वाटते. सबसिडी कमी केल्याशिवाय तूट कमी होणार नाही. जास्त सबसिडी पेट्रोलियम पदार्थांनाच दिली जाते, असेही ते म्हणाले.
60 हजार कोटींचा बोजा : पेट्रोल नियंत्रणमुक्त, मात्र डिझेल, एलपीजी आणि केरोसीनचे दर अजून सरकारच्या नियंत्रणात, पेट्रोलियम पदार्थांवर दिलेल्या सबसिडीपोटी चालू वर्षात तिजोरीवर 60 हजार कोटींचा बोजा, मल्टिब्रँड रिटेल, पेन्शन, विमासारख्या क्षेत्रात सुधारणांची गरज असल्याचे रंगराजन यांना वाटते.
EXCLUSIVE: प्रणवदांवर पंतप्रधान नाराज, स्‍वतः घेणार अर्थमंत्रालयाचा ताबा