आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे टीकास्त्र : शून्य वाढवणे कॅगच्या सवयीचेच झाले आहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तीन लाख कोटींचा महाघोटाळा शुक्रवारी कॅगच्या अहवालाने उघड झाला. शनिवारी सरकार व काँग्रेसने कॅगवर टीकास्त्र सोडले. आपल्या अहवालात शून्यावर शून्य वाढवत खळबळ उडवून देण्याची सवय कॅगला लागल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी शनिवारी केला. कॅग कधी 1.76 कोटी लाख कोटींचा आकडा सांगते तर कधी 1.86 लाख कोटींचा, असेही तिवारी म्हणाले.
कंपनी व्यवहारमंत्री वीरप्पा मोईली यांनी कॅगचा अहवाल हे अंतिम सत्य नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, दरवेळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करणे ही भाजपची सवय बनली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी म्हणाले की, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभे करून कॅगने जणू लक्ष्मण रेषाच ओलांडली आहे. दरम्यान, कॅगवर काँग्रेसने सोडलेले टीकास्त्र म्हणजे विशेषाधिकाराचा भंग असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, कोळसा खाण लिलावासंदर्भातील सर्व फाइल्सवर कोळसा मंत्री या नात्याने पंतप्रधानांच्या सह्या आहेत. अशा परिस्थितीत ते निर्दोष कसे असू शकतात.
कॅगने लक्ष्मणरेषा ओलांडली नाही- सरकारनेच आखलेल्या धोरणानुसार सर्व काही होते आहे की नाही, हे आम्ही पाहतो. कॅगने या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन केलेले नाही.’ ए.के. पटनायक, उपनियंत्रक व महालेखा परीक्षक
सरकार विरूद्ध कॅग : पुढील लढाई
सरकार दोन मुद्यांवर प्रत्युत्तर देईल 1. तोट्याच्या आकडेवारीचा आधार काय? 2. ज्या कंपन्यांनी काम सुरू केले नाही त्यांचा लिलाव रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे खासगी कंपन्यांना लाभ पोहोचविल्याचा मुद्दा कुठून येतो?
कॅग 2004 मध्ये घोषणा केल्यानंतरही कोळसा खाण लिलाव का केला गेला नाही? कोळसा सचिवांच्या शिफारशी पंतप्रधानांनी दोन वेळा का फेटाळल्या? हा कॅगचा आक्षेप मनमोहन सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
भाजप- पक्षाने कोळसा घोटाळ्यास निवडणूक मुद्दा बनवण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत मंगळवारी भूमिका ठरवली जाणार आहे.
8 तासांत 816 एसएमएस
रांचीचे राकेश यांनी सांगितले की, सरकारवर विश्वास ठेवणे म्हणजे सूर्यावर जीवसृष्टी असल्याचे मान्य करण्यासारखे आहे.
अशोकनगरच्या बी. के. त्रिपाठी यांनी म्हटले ‘अहवाल येताच सरकारने तो चुकीचे असल्याचे कसे काय म्हटले? चौकशी करून नंतर बोलले असते तर बरे झाले असते.’
बूंदीचे दीपक साहू म्हणतात, याच कॅगने राजा, कलमाडींसारख्या भ्रष्ट नेत्यांना तुुरुंगात धाडले होते. ते खोटे कसे काय असू शकतील?
अहमदाबादच्या शैलेश शाह यांनी म्हटले की या खोटे बोलण्याचा फायदा सरकारला होईल. कॅगला नव्हे.
खोटे बोलण्याचा लाभ केवळ सरकारला- देशातील जनतेला सरकारपेक्षा भ्रष्टाचार उघडकीस आणणा-या कॅगवर अधिक विश्वास आहे. कोळसा, विमान प्राधिकरण व वीज घोटाळ्याबाबत शक्रवारी कॅगचा अहवाल आल्यानंतर दिव्य मराठी नेटवर्कने लोकांचे मत जाणून घेतले. कोण खरे बोलत आहे? सरकार की कॅग? उत्तरादाखल केवळ 8 तासांत 816 एसएमएस आले. त्यात 96 % लोकांनी कॅग खरे असल्याचे म्हटले. 1 % लोकांनी सरकारवर विश्वास असल्याचे म्हटले तर 3 टक्के लोकांनी कॅग व सरकार दोघांवरही विश्वास नसल्याचे मत नोंदवले.