आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू पंजाबननंतर आता सोनू बंगालन सेक्स रॅकेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांनी आणखी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटचा प्रमुख सोनू बंगालन आणि त्याचा सहकारी गौरव आनंद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी चार कॉलगर्लला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेक्स रॅकेट गेल्या चार-पाच वर्षापासून दिल्ली व आसपासच्या भागात चालू आहे. या रॅकेटच्या प्रमुखाने यमुनापार भागात मधुविहारमध्ये एक घर भाड्याने घेतले होते. हे रॅकेट गीता कॉलनी, कडकड्डूमा, आनंद विहार या भारत सक्रिय होते.
पोलिसांनी सांगितले की या सेक्स रॅकेटमध्ये दिल्ली, झारखंड, उत्तराखंड आणि नेपाळच्या मुलींचा समावेश आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्या वारंवार आपले घर व अड्डा बदलत होत्या.
दिल्ली पोलिसांनी याआधी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्याची प्रमुख गीता अरोडा ऊर्फ सोनू पंजाबन याला पोलिसांनी २००८ साली अटक केली होती. त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोनू पंजाबन ही पहिली अशी कॉलगर्ल आहे जिने या व्यवसायाला 'कार्पोरेट कल्चर'चे रुप दिले.