आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Call The Meeting On Women Attck And Compasiation : Supreme Court

महिलांवरील हल्ले व पीडितांना नुकसान भरपाई बाबत बैठका घ्‍या : सर्वोच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - महिलांवरील वाढत्या अ‍ॅसिड हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करतानाच त्याला आळा घालण्यासाठी तसेच पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी कायदा बनवण्यासंदर्भात सहा आठवड्यांत राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलवावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय गृहसचिवांना दिले. न्यायमूर्ती आर.एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने बुधवारी हे निर्देश दिले. अ‍ॅसिड विक्रीवर नियंत्रण व हल्ल्यांसाठी होत असलेल्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत पीठाने नाराजी व्यक्त केली.