आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानी दिल्ली सर्वात यशस्वी शहर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकांना यश मिळवून देणारे व सर्वांची स्वप्ने साकार करणारे शहर म्हणून कधी काळी मायानगरी मुंबईचा देशभर दबदबा होता. परंतु महानगराच्या या ख्यातीला धक्का बसला असून उद्योजक व व्यावसायिक लोकांना यश मिळवून देण्यात देशातील सर्वात यशस्वी शहर म्हणून राजधानी दिल्लीने पहिले स्थान पटकावले आहे. यशस्वी शहरात मुंबईची दुसर्‍या स्थानी घसरण झाली आहे. सर्वाधिक यशस्वी शहरांच्या यादीत दहाव्या स्थानी पुण्याचा समावेश झाला आहे.
यशस्वी शहरांच्या यादीत नवी दिल्ली या शहराने सलग तिसर्‍या वर्षी पहिले स्थान कायम ठेवून हॅट्ट्रिक साधली आहे. विशेष म्हणजे या यादीत दिल्लीशिवाय एनसीआरच्या चार शहरांनी टॉप -30 मध्ये जागा मिळवली आहे. गुडगाव सहाव्या, नोएडा आठव्या तर फरिदाबाद 29 व्या स्थानी आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख कायम असली तरीही त्याच्या जोरावर मुंबई शहर दिल्लीवर आघाडी घेऊ शकले नाही, परंतु या महानगरीने तिचे यादीतील दुसरे स्थान कायम ठेवले आहे. चेन्नईने गेल्यावेळच्या तुलनेत आपल्या स्थानात सुधारणा करत यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
आघाडीची संशोधन 'प्रतिस्पर्धी संस्थान'ने 2012चा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात शहरातील 50 शहरांची पाहणी करण्यात आली. राजधानी बुधवारी रात्री दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ही यादी सार्वजनिक करण्यात आली.
दिल्ली नंबर वन कशासाठी?- अहवालानुसार राजधानी दिल्लीच्या यशाचे कारण येथील विकासाचा आर्थिक दर कायम असून मागणी तसेच विकास यांचे संतुलन कायम राहिल्याने दिसून आले. अर्थात अहवालात दिल्लीत प्रशासन व संस्थात्मक यंत्रणेत सुधारणा होण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
-उत्तर प्रदेशातील शहरे या बाबतीत पिछाडीवर आहेत. लखनऊ, आग्रा, अलाहाबाद या यादीतून बाहेर.
-कोइम्बतूर, म्हैसू, मदुराई व गुवाहाटी ही शहरे यादीत आधीच्या तुलनेत वरच्या स्थानी आली.
देशातील यशस्वी शहरे- दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, गुडगाव, बंगळुरू, अहमदाबाद, पुणे.