आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cash Reward Offered By Kisan Sena On Hafiz Sayeed And Yasin Malik Head

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाफीज सईद, यासिन मलिकच्‍या शिरावर किसान सेनेकडून लाखोंचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्‍नौज- मुंबईवर 26 नोव्‍हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद तसेच जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) नेता यासिन मलिक यांच्या शिरावर उत्तर प्रदेशातील किसान सेनेने बक्षीस जाहीर केले आहे. हाफीजच्‍या शिरावर 51 लाख रुपये तर मलिकच्‍या शिरावर 11 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

किसान सेनेचे अध्यक्ष विनोद यादव यांनी हाफीज सईद आणि यासीन मलिक यांच्या शिरावर बक्षीस जाहीर केले आहे. या दोघांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यादव यांनी केली आहे. कन्‍नौजमधील छिबरामऊ येथे कार्यकर्त्यांना उद्देशून यादव म्हणाले, दहशतवादी आणि राष्ट्रविरोधी लोकांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी. सईद हा दहशतवादी असून भारताचा शत्रू आहे. तर यासिन मलिक हा काश्मीरवरील अन्यायाचे भांडवल करून दहशतवाद्यांना मदत करीत आहे. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत क्षमा करायला नको, असे यादव म्‍हणाले.