आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीडीटी चेअरमनचा अहवाल सादर : ‘काळ्या पैशा’वर तकलादू शिफारशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काळा पैसा रोखण्यासाठी उपाय सुचवणा-या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) चेअरमनच्या अध्यक्षतेखालील समितीने केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. अहवालात ठोस उपाय सुचवण्याऐवजी कायदा बदलण्याच्या गरजेसारखे अत्यंत किरकोळ आणि टाळाटाळ करणारे कामचलाऊ उपाय सुचवण्यात आले आहेत.
सरकारने स्थापन केलेल्या या समितीचा ‘मेझर्स टू टॅकल ब्लॅक मनी इन इंडिया अँड अ‍ॅब्रॉड’ या 103 पानांच्या अहवालाची प्रत ‘दिव्य मराठी’ नेटवर्ककडे आहे. यातील शिफारशींनुसार सार्वजनिक पदावर असलेल्या नेत्याने पदावरून हटल्यानंतर आपली संपत्ती जाहीर करणे, कायद्यात बदल, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणे आणि बँक खात्यांवर करडी नजर ठेवणे अशा बाबी आहेत.
शेती क्षेत्राला मिळालेल्या सवलतीमुळे काळा पैसा वाढत असल्याचे समितीचे मत आहे. सोने आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीला समितीने काळ्या पैशाचे स्रोत म्हणून अधोरेखीत केले आहे. त्याला लगाम घालण्यासाठी सध्याचे लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती तत्काळ करण्याची शिफारसही यात आहे.
कुचकामी उपाय
- विदेशातून पैसे मागवणे व आणण्यावर पाळत ठेवण्यासाठी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट सक्षम करण्यावर भर
- पक्षांच्या निवडणूक खर्चासाठी काळा पैसा उपलब्ध होण्यास प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक कायदा बदलण्याची गरज
- प्राप्तिकर मूल्यांकन प्रकरणे पुन्हा उघड करण्यासाठीची मुदत सहा वर्षांऐवजी 16 वर्षे करावी
- बचतीसाठी होणारा सोन्याचा वापर कमी करण्याची गरज
- एका व्यक्तीला किती खाते काढता येतात याबाबत आरबीआयने कडक धोरण आखण्याची गरज. - एकाच पत्त्यावरच्या वेगवेगळ्या नावांच्या खात्यांवर पाळत ठेवण्याची गरज.
कठोर उपाय
- लॉ इन्फोर्समेंट एजन्सीसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र असावे
- खासगी क्षेत्रही लेखापरीक्षणाच्या कक्षेत आणावे. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी गतीने पावले उचलण्याची गरज
- नॉन प्रॉफिट संघटनेबाबत एक केंद्रीय डाटा असावा. त्याच्या खात्यांची पूर्ण माहिती ठेवावी.
- सरकारी कर्मचा-यांच्या कामगिरीबाबत मोबदला आणि शिक्षेबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रस्ताव तत्काळ अमलात यावा. यासंदर्भात माहिती देणा-यास पुरेसे संरक्षण मिळावे
- सीबीडीटी, सीबीईसीसह काळ्या पैशाविरुद्ध काम करणा-या संस्थांतील कर्मचा-यांचा तुटवडा कमी करावा.
या मुद्द्यांवर मात्र मौन! (अर्थतज्ज्ञांची मते)
- निवडणुकीपूर्वी राजकीय नेते मालमत्ता जाहीर करतात. यातील किती संपत्ती कोठून, कशी कमावली हे कुठे सांगतात?
- निवडणुकीत काळ्या पैशावर गोष्टी केल्या, पण तो रोखायचा कसा हे नाही सांगितले?
- आरबीआय अ‍ॅक्ट, फेमा कायद्यात दुरुस्तीची गरज मांडली, पण काय दुरुस्ती हवी, यावर भाष्य नाही.
- शेतीमध्ये काळा पैसा निर्माण होत असल्याचे म्हटले जाते. ते रोखण्यासाठी उपाय तरी सांगा?
- परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे उपाय सुचवले नाहीत.
- परदेशात काळा पैसा जमाच करता येणार नाही, असे उपाय नाहीत.
- रिअल इस्टेटमधील काळा पैसा रोखला पाहिजे, त्यावरील उपाय काय?
ही घ्या चावी.. उघडा काळ्या पैशाची तिजोरी
काळ्या पैशावर जादूची कांडी नाही : मनमोहन सिंग
काळ्या पैशांबाबत रामदेवबाबांनी घेतली शरद पवारांची भेट
45 लाख कोटींचा काळा पैसा परदेशात- फिक्की; 9 पटींनी वित्तीय तूट भरून निघेल
काळा पैसा आणल्याशिवाय गरिबांचे भले होणार नाही - मुलायमसिंग यादव