आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबाद - सीबीआयचे माजी न्यायाधीश चलापथी राव यांच्या दोन घरांवर शनिवारी धाडी टाकण्यात आल्या. कर्नाटकातील भाजपचे माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांना जामीन देण्याच्या प्रकरणात राव यांच्या भूमिकेबद्दल संशय होता.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश टी. पट्टाभिरामा राव यांना शुक्रवारी या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. रेड्डींना जामीन देण्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआच्या तपास पथकाने न्यायाधीश चलापथि यांच्या गुंटूर आणि चिलकुलरिपेट येथील घरांवर धाडी टाकल्या. यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. राव यांच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयने अॅड. तारकराम आणि श्रीनिवास राव यांच्या घरांवरही धाडी टाकल्या आहेत. माजी न्यायाधीशांच्या भावाचीही चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयचे निलंबित न्यायाधीश पट्टाभिरामा राव यांना अटक करण्याची तयारी सुरू असून त्यासाठी एफआयआर दाखल करावा लागणार आहे. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे जमा करण्याचे काम सीबीआय करणार आहे. या प्रकरणात आंध्र प्रदेशातील एक मंत्री आणि दोन आमदारांची भूमिकादेखील वादाच्या घे-यात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.