आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच कोटींची लाच घेणारा सीबीआयचा न्यायाधिश निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश मदन बी. लोकुर यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्यायाधिश टी. पत्तभी रामाराव यांना शुक्रवारी निलंबित केले. माजी मंत्री व अवैध खाणकाम प्रकरणातील प्रमुख आरोपी जनार्धन रेड्डी यांच्याकडून पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचाही गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
रामाराव यांनी रेड्डींचा जामीन 12 मे रोजी मंजूर केला होता. त्यानंतर रेड्डीची जामीनावर सुटका झाली होती.