आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cctv Camera Captures Kidnapping Of Two Children From Ajmer Dargah‎

अजमेरमध्ये दर्ग्यातून मुलगा चोरणारा फकीर कॅमे-यात कैद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर - अजमेर दर्गा परिसरात शनिवारी दोन मुले बेपत्ता झाली. पहिल्या घटनेत नागपूर येथील रहिवाशी शमीम आणि नफिसा या जोडप्याचा दोन वर्षांचा मुलगा सोलहखंभा परिसरातून गायब झाला. कमानी गेट भागातील दुस-या घटनेत कानपूर येथील रहिवासी छन्ना आणि अनिता यांचा सात वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला.
अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्हाभरात नाकेबंदी केली. मात्र, पोलिसांना कोणताही धागादोरा मिळाला नाही. पोलिसांनी यासंबंधीची माहिती जारी करत देशभर अलर्ट जारी केला. दोन दिवसांपूर्वी पतीशी भांडण करून नागपूरहून अजमेरला आलेल्या नफिसाला एक फकीर भेटला. त्याने विश्वासात घेऊन नफिसाला एके ठिकाणी एकटीला जेवण करण्यास पाठवून दिले. यादरम्यान फकिराने तिच्या मुलाचे अपहरण केले. दुस-या प्रकरणात अनिताने दिलेल्या माहितीनुसार, दारुड्या पतीचा त्रास सहन न झाल्याने अनिता आठवडाभरापासून येथे राहत आहे. ती भीक मागून पोट भरत होती. एका दुकानासमोर टीव्ही पाहत असताना तिचा मुलगा गायब झाला. दोन्ही घटना पाच तासांच्या आत घडल्या.
19 दिवसांपूर्वी याच भागात मुलाची चोरी झाली होती - 17 जुलै 2012 रोजी सहा महिन्यांच्या नासीरचे दर्गा परिसरातून अपहरण झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी कैद झाली होती. चोरी करणा-या महिलेचे छायाचित्र देशभरातील पोलिस ठाण्यांत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर दुस-या दिवशी नागौर जिल्ह्यातील एका गावात हा मुलगा सापडला. याप्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या मौलवी पतीला अटक करण्यात आली होती.