आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विकाऊ चित्रपट मंजुरीसाठी पैसे घेतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘विश्वरूपम’चा वाद संपला असला तरी तामिळनाडूच्या अ‍ॅडव्होकेट जनरलनी केलेल्या वक्तव्यावर सेन्सॉर बोर्ड भडकले आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी बोर्डाकडून करण्यात आली आहे.
‘विश्वरूपम’ किंवा इतर कोणत्याही चित्रपटाला मान्यता देणारी प्रक्रिया ही संसदेने मंजूर केलेल्या कायदा आणि नियमांच्या चौकटीनुसार आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी माफी मागावी, असे मंडळाने म्हटले आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल नवनीत कृष्ण आणि वकील शंकरसुबू यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. चित्रपटांना प्रमाणित करण्याच्या या प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. मंडळाचे सदस्य विकत घेतले जाऊ शकतात, असे शंकरसुबू यांनी म्हटले होते. ही विधाने बिनबुडाची आणि अवमानकारक असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.