आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Centre Government Distributes 13 Corore Folic Iran Tables To Girls

केंद्र सरकार 13 कोटी मुलींना लोहाच्या गोळ्या देणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

-
नवी दिल्ली - मुलींमधील रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया) रोखण्यासाठी त्यांना दर आठवड्याला आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. देशभरातील 10 ते 19 वर्षे वयाच्या मुलींना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. येत्या तीन महिन्यांत आरोग्य मंत्रालय ही योजना कार्यान्वित करणार असून दर सोमवारी विद्यार्थिनींना आयर्न फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत.

रा ष्‍ट्री य ग्रामीण आरोग्य मिशनच्या प्रकल्प संचालक अनुराधा गुप्ता यांनी सांगितले की, 6 कोटी शालेय विद्यार्थिनींना आणि 6 ते सात कोटी शाळाबाह्य मुलींना या गोळ्यांचे वाटप आम्ही करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. मुलींच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी त्यांना दर सहा महिन्यांनी अल्बेंडॅझोलचा (400 मिलिग्रॅम) डोसही दिला जाणार आहे. अल्पवयीन मुलींना योग्य आहाराची माहिती देणे आणि त्यातून
लोहाचे प्रमाण वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.