आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Challenging Modi, Keshubhai Launches New Party In Gujarat‎

मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपुढे आव्हान, गुजरातमध्ये भाजपची अडचण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरच माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यांचे कट्टर हाडवैरी आणि गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना लक्ष्य करत केशुभार्इंनी ही आघाडी उघडल्यामुळे भाजपसमोर मोठेच संकट उभे ठाकले आहे.
मोदीविरोधी शक्तींची एक मोट बांधण्याच्या उद्देशाने 83 वर्षीय केशुभार्इंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. या वर्षअखेरीस होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 182 मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली. केशुभाई हे गुजरात भाजपचे एक शक्तिशाली नेते मानले जातात. आपला पक्ष गुजरातचे सध्याचे राजकीय चित्रच बदलून टाकेल, असेही ते म्हणाले. मोदींशी असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर केशुभार्इंनी गेल्या शनिवारीच भाजपला रामराम ठोकला आहे. मोदी यांनी राज्याच्या सन्मान आणि सार्वभौमत्वाशी तडजोड केली असून गुजरातचे हे वैभव परत आणण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे.
1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपला सत्तेत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोदी यांचे आणखी एक कट्टर विरोधक गोवर्धन झदाफिया यांनी स्थापन केलेला ‘महा गुजरात जनता पार्टी’ हा पक्ष आपल्या पक्षात लवकरच विलीन होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.