आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
जीरकपूर - चंदिगडमधील छतबीर प्राणीसंग्रहालयातील हॅली नावाची सिंहिण सध्या टॉप सेलिब्रिटी बनली आहे. याच सिंहिणीच्या जोरावर प्राणीसंग्रहालयाला दीड लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. लाखो रुपयांची कमाई करणा-या या सिंहिणीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. आशियाई जातीचा सिंह पाहण्याची वन्यप्राणीप्रेमींची इच्छा वर्षभरापासून हॅलीच पूर्ण करत आहे. प्राणी संग्रहालयात एक सिंह आहे, पण तो आजारी असल्यामुळे पिंज-या पर्यंतच मर्यादित आहे. गेल्या वर्षी गगन या सिंहाच्या मृत्यूनंतर आठ हेक्टर परिसरातील सफारीत एकट्या हॅलीला सोडण्यास प्राणी संग्रहालय प्रशासन विवश आहे.
साडेतीन वर्षांच्या हॅलीसाठी जुनागडमधील युवराज नावाचा सिंह आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवराज हा हॅलीपेक्षा एक महिन्याने लहान आहे. युवराज हा एफ वन जनरेशन श्रेणीतील मूळ प्रजातीचा सिंह आहे. जंगलातील आणि पिंज-या तील सिंहाच्या ब्रीडिंगमधून जन्मलेले छावे या प्रजातीत मोडतात. त्यामुळे छतबीरमधील प्राणीसंग्रहालयात येणा-या पर्यटक आणि वन्यप्राणी अभ्यासकांना काही दिवसांनी पूर्ण वाढ झालेल्या युवराजला पाहण्याचीही पर्वणी मिळेल. तोपर्यंत हॅली हीच प्राणी संग्रहालयाची सेलिब्रिटी असेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.