आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandigarh Gang Rape Victim Had Relationship With Married Man

चंदिगढ गँगरेप पीडितेचे होते अनैतिक संबंध, प्रियकराच्‍या पत्‍नीनेच कांड घडविल्‍याचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- चंदिगढमधील तरुणीवर सामुहिक बलात्‍काराच्‍या घटनेला वेगळेच वळण प्राप्‍त झाले आहे. वृत्तसंस्‍था 'पीटीआय'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, पीडित तरुणीवर हत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याचा एक गुन्‍हाही दाखल आहे. ती नुकतीच जामीनावर सुटली होती. पीडितेचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य सबंध होते. त्‍याच्‍या पत्‍नीनेच अपहरण केले आणि तिच्‍या दोन साथीदारांनी बलात्‍कार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.

पीडित मुलीला बठिंडा येथे कारमधून फेकून देण्‍यात आले होते. या घटनेसंदर्भात पीटीआयने बठिंडाचे वरीष्‍ठ रविचरण ब्रार यांचा हवाला देऊन वृत्त दिले आहे. त्‍यानुसार, तरुणी परिचारिका असून तिच्‍यावर पंजाबच्‍या फजिल्‍का भागात हत्‍येचा प्रयत्‍न केल्‍याचा गुन्‍हा दाखल आहे. ती बठिंडा येथे काम करते. तिथे सुनील नावाच्‍या एका विवाहीत पुरुषासोबत तिचे संबंध जुळले. सुनीलच्‍या पत्‍नीला एड्स झाल्‍याचे निदानही करण्‍यात आले होते. त्‍याच्‍या पत्‍नीने या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सुनील अजूनही तुरुंगात आहे.

पीडित तरुणीने सुनीलच्‍या पत्‍नीवर आरोप केले आहेत. तिने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार, चंदिगढमध्‍ये बसच्‍या प्रतिक्षेत असताना सुनीलची पत्‍नी, त्‍याची आई आणि दोन अनोळखी व्‍यक्ती तिच्‍या समोर एका कारमध्‍ये येऊन थांबले. त्‍यांनी तिला कारमध्‍ये ओढले. बेशुद्धीच्‍या औषधांचे इंजेक्‍शन देऊन तिच्‍यावर दोघांनी आळीपाळीने दोन दिवस बलात्‍कार केला. एका व्‍यक्तीने बलात्‍काराचे चित्रीकरणही केले. त्‍यानंतर बठिंडा येथे कारमधून फेकून दिले. एका व्‍यक्तीने तिला बेशुद्धावस्‍थेत पाहिल्‍यानंतर रुग्‍णालयात नेले.

पीडितेने केलेल्‍या आरोपांची चौकशी सुरु आहे. तिला रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून बलात्‍कार झाल्‍याचे अहवालात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे. परंतु, या घटनेने तिला मानसिक धक्‍का बसला आहे. शुद्धीवर आल्‍यावर ती घाबरते आणि पुन्‍हा बेशुद्ध पडते.