आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrababu Demand Babli Project Decision Re Consider

आंध्र प्रदेशने फेरविचार याचिका दाखल करावी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मछलीपट्टणम- बाभळी बंधार्‍याच्या बांधकामाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आंध्र प्रदेश सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधण्यात येणार्‍या बाभळी बंधार्‍याला विरोध करणारी आंध्र प्रदेशची याचिका न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

महाराष्ट्राच्या बाजूने हा निकाल लागला आहे. या बंधार्‍यामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने हे प्रकरण फारसे काळजीपूर्वक हाताळले नाही. कार्यक्षम वकिलामार्फत न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यात मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी अपयशी ठरले आहेत, असे नायडू यांनी आपल्या पदयात्रेदरम्यान कृष्णा जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.