आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्‍णांच्‍या पवारांवरील वक्तव्‍यामुळे संतापलेला होता जोडा फेकणारा किशनलाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडूनः टीम अण्‍णाच्‍या जाहीर सभेमध्‍ये जोडा फेकण्‍याचा प्रकार घडला आहे. किशनलाल नावाच्‍या व्‍यक्तीने टीम अण्‍णाचे सदस्‍य व्‍यासपीठावर असताना जोडा फेकला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण हे टीम अण्‍णाचे सदस्‍य व्‍यासपीठावर असताना हा प्रकार घडला.
विधासभा निवडणुकांमध्‍ये भ्रष्‍टाचाराविरूद्धचे जन-जागरण आंदोलन टीम अण्‍णाने आज हरिद्वार येथून सुरु केले. हरिद्वार येथील ऋषिकुल मैदानामध्‍ये त्‍यांची पहिली जाहीर सभा होणार होती. परंतु, प्रशासनाकडून त्‍यांना परवानगी नाकारण्‍यात आल्‍यानंतर एका सभागृहात ही सभा आयोजित करण्‍यात आली होती. हरिद्ववार येथील सभेमध्‍ये गदरोळ झाला होता. त्‍यानंतर डेहराडून येथील सभेमध्‍ये किशनलाल या व्‍यक्तीने व्‍यासपीठाच्‍या दिशेने जोडा भिरकावला. किशनलाल हा अण्‍णा हजारेंच्‍या वक्तव्‍यावरुन नाराज होता. अण्‍णांनी शरद पवार यांना थापड मारल्‍यानंतर 'एक ही मारा?' अशी प्रतिक्रीया दिली होती.
हरिद्वार नंतर टीम अण्‍णा 22 तारखेला रूदप्रयाग, हल्‍दानी आणि 23 जानेवारीला श्रीनगर येथे सभा घेणार आहे. या सभांमध्‍ये अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनीष सिसोदिया, कुमार विश्‍वास आदी सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांतील भ्रष्‍टाचार विरोधी जनआंदोलनासाठी भारत विकास परिषद, शांतिकुंज, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि उलेमा परिषद देवबंदचे सहकार्य मिळत असल्‍याचे टीम अण्‍णांचे सदस्‍य कुमार विश्‍वास यांनी सांगितले.
अण्‍णा हजारे-रामदेव बाबा एकत्र, निवडणुकांमध्‍ये करणार प्रचार
हा तर लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न- अण्‍णा हजारे
टीम अण्‍णा बॅकफूटवर, कोणत्‍याही एका पक्षाविरुद्ध प्रचार नाही