आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet File Within 45 Hours By Madhya Pradesh

मध्‍य प्रदेश मध्‍ये बलात्कार प्रकरणाची चार्जशीट 45 तासांत दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भोपाळ - दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणापासून धडा घेत जबलपूर जिल्हा पोलिसांनी एका बलात्कार प्रकरणात 45 तासांत आरोपपत्र दाखल केले. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी असणा-या आरोपीविरुद्ध कारवाई करताना पोलिसांनी कोणतेही दडपण घेतले नाही. शिहोरा पोलिस ठाण्यात एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध 45 तासांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती जबलपूर रेंजचे महासंचालक मधू कुमार यांनी दिली. आरोपी कॉँग्रेस नगरसेवक मोहंमद गौस आझादला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सबळ पुरावेही जमा केले असल्याचे कुमार म्हणाले. संबंधित प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून एक-दोन महिन्यांत निकाल येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिहोरा शहरातील नगरसेवक असलेल्या आझादने 13 रोजी अंधाराचा फायदा घेत मुलीच्या घरी जाऊन बलात्कार केला. या वेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. मुलीकडून आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याच्याविरुद्ध तत्काळ आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.