आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौटाला पिता-पुत्रांना दहा वर्षांचा तुरुंगवास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौटाला (78), त्यांचे चिरंजीव आमदार अजय चौटाला (51) यांच्यासह अन्य 7 आरोपींना सीबीआय कोर्टाने मंगळवारी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षांपेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाली तर अटकेतील आरोपींना सहसा जामीन दिला जात नाही. त्यामुळे चौटाला पिता-पुत्रांना तूर्त तुरुंगातच राहावे लागणार आहे.

निकाल जाहीर होताच रोहिणी विशेष न्यायालयाबाहेर जमलेल्या चौटाला समर्थकांनी पोलिस तसेच वकिलांवर तुफान दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार तसेच अश्रुधुराचा वापर केला. वृत्तसंस्थेनुसार कोर्टाच्या परिसरात देशी बॉम्बही फेकण्यात आले.

काय आहे प्रकरण?
1999 ते 2000 या काळात हरियाणात 3206 शिक्षकांची भरती झाली. यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ओमप्रकाश चौटाला तेव्हा मुख्यमंत्री होते. 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे चौकशी सोपवली. 62 जणांवर आरोपपत्र दाखल झाले. यातील 55 जणांना दोषी ठरवण्यात आले. 09 आरोपींना 10 वर्षांची, एका आरोपीला 5 वर्षे आणि 45 आरोपींना 4 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.