आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - 26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडली यास अमेरिकेतील शिकागो कोर्टाने 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. 2008 मध्ये झालेल्या या हल्ल्यात 166 निप्पाप लोक मृत्युमुखी पडले होते.
मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांना सहकार्य करून हेडलीने प्रमुख भूमिका निभावल्याचे न्या. हॅरी लिनेनवेबर यांनी निकालपत्रात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात हेडलीचा साथीदार तहव्वूर राणा यास कोर्टाने 14 वर्षांच्या तुरुंगवासासह तीन वर्षाच्या नजरकैदेची शिक्षा सुनावली होती. मुंबई हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना मदत पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
2009 मध्ये हेडली आणि राणा या दोघांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात साक्षीपुरावे तपासल्यानंतर सरकारी पक्षाने हेडलीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली; परंतु कोर्टाने फाशी न देताना दीर्घकाळ तुरुंगवास ठोठावला. हेडलीच्या विरोधात कोर्टात सादर करण्यात आलेले दस्तऐवज तसेच चित्रफिती या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरला. हल्ला हाताळणारा साजिद मीर याच्याशी हेडलीचे संबंधही सबळ पुरावा ठरले.
... तर फाशीच झाली असती : निकम
हेडलीचे भारताकडे प्रत्यार्पण झाले असते तर त्याला फाशीच झाली असती, अशी प्रतिक्रिया मुंबई हल्ल्याच्या खटल्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.