आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी ईएमआय कमी करावे : अर्थमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॅंकांनी व्याजदरात कपात करावी. कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम (ईएमआय) कमी करावी, असे आर्जव अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बँकांना केले आहे. कर्जाचे व्याजदर कमी करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांचे प्रमुखांशी शनिवारी झालेल्या बैठकीत चिदंबरम यांनी वरील आवाहन केले.
ईएमआयचे गणित : वाढलेल्या ईएमआयचे गणित सोडवण्यासाठी चिदंबरम यांनी एसबीआयचे उदाहरण सांगितले. ईएमआय कमी झाल्यानंतर मोटारींची विक्री वाढली. 7 वर्षांच्या कर्जासाठी ईएमआय 1,766 रुपये (प्रतिलाख प्रतिमहिना) होता, तेव्हा प्रतिदिन 400 मोटारींची विक्री होत होती. ईएमआय कमी करून 1,725 रुपयांवर आणला त्या वेळी 700 मोटारींची विक्री झाली; पण हाच ईएमआय आणखी कमी करून 1,699 रुपयांवर आला त्या वेळी 1200 मोटारींची विक्री झाली. या उदाहरणाचा अवलंब इतर बँकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
एज्युकेशन लोन हा तर विद्यार्थ्यांचा अधिकार- शिक्षणासाठी घेण्यात येणारे एज्युकेशन लोन हा विद्यार्थ्यांचा अधिकारच आहे. पात्र विद्यार्थ्यांना असे कर्ज नाकारणा-या बँकेच्या अधिका-यांवर कारवाईचे संकेत चिदंबरम यांनी दिले.