आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये मेनू कार्डवरून चिकन हद्दपार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


थिरुवनंतपुरम - करवाढीच्या विरोधात केरळच्या हॉटेल संघटनेने व पोल्ट्री फेडरेशनने बहिष्कार टाकल्यामुळे केरळमध्ये सध्या चिकन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. पोल्ट्री व्यापा-यांकडून केली जाणारी दरवाढ व सरकारने लादलेल्या जास्तीच्या विक्री करामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

केरळमध्ये सध्या 125 रुपयांपेक्षा जास्त प्रतिकिलो दराने चिकनची विक्री होते, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जी. सुधेश कुमार यांनी दिली. दरम्यान, सरकारने 13.5 टक्के विक्री कर मागे न घेतल्यास किरकोळ व घाऊक विक्री बंद करण्याचा इशारा चिकन विक्रेत्यांनी दिला आहे.