आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - रस्त्यावर गुजरान करणारी मुले ग्राहक. तेच खजनिदार आणि व्यवस्थापकही! अशीच अद्भूत बँक आहे ‘चिल्ड्रन डेव्हलपमेंट खजिना’. भलेही ही बँक अन्य सर्वसाधारण बँकांप्रमाणे कोट्यवधी रूपयांचा व्यवसाय करीत नसेलही मात्र त्यामुळे या बँकेचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. गरीब, होतकरु मुले या बँकेत पैसे जमा करण्यापासून, व्याजासहित रक्कम काढण्यापर्यंत सर्व व्यवहार करतात. विशेष म्हणजे या बँकेचा मॅनेजर स्वत: दिवसभर इतर काम करतो. संध्याकाळी बँक उघडतो आणि त्यानंतर पैसे जमा करून घेतो किंवा खातेदारांना पैसे काढून देतो. बँकेत जमा झालेला पैसा दुसºया दिवशी एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत जमा केला जातो. दुकानांमध्ये काम करणारी, हॉकर्स, छोट्या वस्तू विकणारी मुले या बँकेचे खातेदार आहेत.
असा चालतो
बँकेचा व्यवहार
दिल्लीच्या एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा 17 वर्षीय रामसिंह या बँकेचा खातेदार आहे. तो दिवसभर सुमारे 100 कप चहा विकून 50 ते 55 रुपये कमावतो. संध्याकाळी कमाईचा अर्धा भाग बँकेत जमा करतो. ग्राहक म्हणून रामसिंह जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत एक विशेष चमक असते. तो म्हणतो, ‘एक दिवस मोठा व्यवसाय करण्याचे माझे स्वप्न आहे. खजिना बँक माझ्या स्वप्नांचा आधार आहे. एक दिवस माझे स्वप्न नक्की पूर्ण होईल.’
गरज काय ?
दिल्लीतील खजिना बँकेच्या एका शाखेत काम करणारा 14 वर्षीय मॅनेजर सांगतो की, ‘आम्ही गरीब मुले जे काही कमावतो, ते सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर असते. आमच्या या गरजेची पूर्तता बँकेकडून केली जाते. तसेच जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत असल्यामुळे जास्तीची रक्कमही पदरी पडते.’
आंतरराष्ट्रीय स्तरावर शाखा
> बटरफ्लाइज या सामाजिक गटाने 2001 मध्ये काही मुलांना विश्वासात घेऊन खजिना बँकेची सुरुवात केली.
> बटरफ्लाइज ग्रुप सध्याही या बँकेतील रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी मदत करतो.
> या बँकेच्या देश-विदेशात 300 शाखा आहेत. त्यातील 12 शाखा दिल्लीत आहेत.
> या बँकेच्या नेपाळ, बांगला देश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि किर्गिस्तानमध्येही शाखा आहेत.
> बँकेत जमा झालेल्या रक्कमेवर 5 टक्क्यांपर्यंत व्याजही मिळते.
कोण बनू शकतो ग्राहक?
> 9 ते 17 वर्षांपर्यंतची लहान मुले या बँकेत खाते उघडू शकतात.
> ‘स्वत:च्या मेहनतीवर विश्वास’ हीच खाते उघडण्याची एकमेव अट आहे.
> भीक मागणारे किंवा अमली पदार्थांची विक्री करून पैसे कमावणारे या बँकेत खाते उघडू शकत नाहीत.
झीरो बॅलन्सवर उघडा विद्यार्थ्यांचे बँक खाते
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी इंडियन बँक संघटनेची शैक्षणिक कर्ज योजना
बँक अधिकार्याच्या मुलाचे अपहरण
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.