आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China ,pak May Attack Cyber On India; Government Get Report

चीन, पाककडून भारताला सायबर हल्ल्याचा धोका ; सरकारला मिळाला अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात लवकरच एखादा मोठा सायबर हल्ला होऊ शकतो. चीन, पाकिस्तान व तुर्कस्तानसारख्या देशांत याबाबत कट रचला जात आहे, अशी गुप्त माहिती आहे. सायबर गुन्हे शाखेशी निगडित अधिका-यांनी याबाबतची ठोस माहिती केंद्र सरकारला दिली आहे. प्राप्त माहितीनुसार चीनमधील मोबाइल, कॉम्प्युटर व लॅपटॉप निर्माण करणा-या काही कंपन्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात हॅकर्सना याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत.

‘दिव्य मराठी नेटवर्क’ला मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण, आर्थिक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या संस्था, कंपन्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्याकडील गोपनीय तसेच अतिगोपनीय कागदपत्रे, आर्थिक देवाणघेवाणीशी निगडित कागदपत्रे तसेच संरक्षणविषयक उपकरणे, तंत्रज्ञानासाठी लागणारे सॉफ्टवेअर यांना टार्गेट करून हा हल्ला केला जाऊ शकतो. या हॅकर्सना देशात सक्रिय असलेले सायबर गुन्हेगार मदत करत आहेत, अशी माहिती आहे.
अर्थात भारतावर याचा कमी परिणाम यासाठी दिसून येत आहे की, ही व्यवस्था खूप जास्त इंटरकनेक्टेड नाही. अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रात हार्डवेअर व सॉफ्टवेअर इंटरकनेक्टेड नाही. सुरक्षेची बाब म्हणून करण्यात आलेल्या उपाययोजनाही प्रभावी ठरल्या आहेत.

सरकारने तयार केली सुरक्षा योजना : भारतावर सायबर हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन सुरक्षेसंदर्भात विविध आघाड्यांवर सुरक्षा योजना तयार करण्यात आली आहे. गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय याशिवाय नॅशनल टेरेरिझम रिसर्च ऑर्गनायझेशनसह (एनटीआरओ) राष्‍ट्रीय सायबर सुरक्षा नियम तयार करण्यात येत आहेत. संवेदनशील तसेच अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विशेष सुरक्षा योजना तयार केली जात आहे.

अनेक देशांसोबत चर्चा सुरू : सिब्बल
माहिती व तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले की, सायबर हल्ल्याचा धोका वाढत आहे. हॅकिंगचा मुकाबला करण्यासाठी जपानसह अनेक देशांसोबत बोलणी करत आहोत. हॅकिंग हल्ले रोखण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार तंत्रज्ञान विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यासक्रमही लवकरच सुरू केला जाईल.