आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची चहूबाजूंनी कोंडी करण्याचे चीनचे षडयंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताची चहूबाजूंनी कोंडी करण्याचे षडयंत्र चीनने रचले आहे. याकामी पाकिस्तान त्याची मदत करतो आहे. पाकिस्तानने आपले ग्वादर बंदर चीनच्या हवाली केले.चीन या बंदराचा विकास करणार आहे. यामुळे भारताच्या पश्चिम सीमेवरही चीनची निगराणी आणि हजेरी राहणार आहे. देशाच्या पूर्व सीमेवर बंगालच्या खाडीत आणि दक्षिणेत हिंदी महासागरामध्ये पूर्वीपासूनच चीनचे तळ आहेत.उत्तर भागात पाक व्याप्त काश्मिरातही चीनने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे काम सुरू केले आहे.

चीनला का दिले बंदर ?
बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या निर्मितीचे काम सुरुवातीला चीनकडेच होते. नंतर ते बंदराचा विकास करण्यासाठी सिंगापूरच्या प्राधिकरणाला करारावर देण्यात आले. बंदर विकासाचे काम संथगतीने होत असल्याने पाकिस्तान नाराज होता.त्यामुळे शुक्रवारी पाकिस्तानी कॅबिनेटने बंदर विकासाची जबाबदारी पुन्हा चीनकडे देण्याचा निर्णय घेतला.

चिनी नौदलाचा तळ
चीनने या ठिकाणी नौदलाचा तळ उभारावा असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.तळ उभारणार अथवा कसे याबाबत आताच सांगणे कठीण आहे. मात्र, या बंदरावरून यापुढे चिनी युद्धनौकांची वाहतूक सुरू होऊ शकते.

चीनची आकांक्षा
चीन या बंदराचा प्रयोग संरक्षणासंबंधी इतर गोष्टींसाठी करण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. या ठिकाणाहून अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळावर निगराणी करणेही चीनला सोपे आहे.
ग्वादर बंदराहून शिनचांग प्रांतात तेल आणि गॅसची वाहतूक चीनला शक्य आहे. परंतु यासाठी मोठी पाइपलाइन टाकावी लागणार आहे. ही पाइपलाइन पाकिस्तानातून जाईल.त्यासाठी वेळ लागणार आहे.