Home | International | China | chinese intrusion in ladkh

चीनने पुन्हा केली घुसखोरी, भारतीय सैन्याचे बंकर केले नष्ट!

वृतसंस्था | Update - Sep 14, 2011, 10:15 AM IST

गेल्या महिन्यात चीनच्या दोन हेलिकॉप्टरने जम्मू काश्मीरच्या लडाख भागात नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैन्याचे बंकर नष्ट केले होते.

  • chinese intrusion in ladkh

    जम्मू- चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आहे. गेल्या महिन्यात चीनच्या दोन हेलिकॉप्टरने जम्मू काश्मीरच्या लडाख भागात नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैन्याचे बंकर नष्ट केले होते. सुदैवाने त्या बंकरमध्ये एकही भारतीय सैनिक नव्हता त्यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समजते. २५ ऑगस्ट रोजी चुमूर भागात घुसखोरी केलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सात ते आठ चीनी सैनिक होते. बंकर नष्ट केल्यानंतर हे हेलिकॉप्टर परत गेले. सैन्यदलाने अद्यापपर्यंत अशी घटना घडली नसल्याचे सांगितले.
    चुमूर भागात कार्यरत असणा-या आयटीबीपीने स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन गृहमंत्रालयाला अहवाल पाठवला होता असे लेह प्रशासनाने आपल्या अहवालात म्हटले आहे. लेहचे उपआयुक्त टी.आंग्चुक यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवला असल्याचे सांगितले. घटनेची चौकशी करण्यासाठी उपविभागीय न्यायाधीश आणि न्योमाच्या अधिका-यांना घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यास सांगितले आहे. घुसखोरी झाल्याची माहिती लेह प्रशासनाला ९ सप्टेंबरला समजली होती.
    आपले मत
    चीनच्या घुसखोरीबाबत सरकार गंभीर आहे का? चीनच्या या हालचालींचा काय अर्थ काढला पाहिजे? आपण ही आपले मत नोंदवू शकता. आक्षेपार्ह मतास वाचक स्वत: जबाबदार असतील.

Trending