आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Kung Fu And Bal Fusion \'s Invitation To Indian

चिनी कुंग फू आणि बॅलेच्या फ्यूजनची भारतीयांना मेजवानी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुंग फू आणि बॅले यांच्या फ्यूजनवर आधारित नृत्यसंगीताचा कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा शो 1 फेब्रुवारीपासून देशातील विविध शहरांत सादर केला जाणार आहे.

बीजिंग येथील परफॉर्मिंग आर्ट कंपनी चायना हेवन क्रिएशन आणि भारतातील आर्य कार्निव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा शो सादर करण्यात येणार आहे. दिल्लीनंतर मुंबई, बंगळुरूत हा शो सादर करण्यात येईल. कोलकात्यात त्याला सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. ‘द लिजेंड ऑफ कुंग फू’ असे शोचे नाव आहे. कुंग फू, बॅले, मॉर्डर्न डान्स, नाट्यकला, जादूसह अत्याधुनिक संगीत आणि प्रकाशयोजनेचा खेळही त्यात पाहायला मिळणार आहे.

मार्शल आर्ट्स प्रकारातील कुंग फू हा बराचसा आक्रमक प्रकार आहे. बौद्ध भिक्खू कुंग फूच्या माध्यमातून आंतरिक शांतीचा अनुभव घेतात. अतिशय प्राचीन अशी ही पद्धती आहे, असे त्याचा सराव करणारे सांगतात. बौद्ध धर्माचा उगम भारतात झाला. हाच धागा चिनी लोकांना भारताशी बांधून ठेवणारा आहे, असे झँग झिहाँग यांनी म्हटले आहे. झिहाँग हे चिनी राजदूत कार्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी आहेत. दोन्ही देशांचे तत्त्वज्ञान, संस्कृती, धार्मिक पातळीवरील मूल्ये समान आहेत. आम्हाला भारतीय रसिकांशी संवाद साधण्याची खूप उत्सुकता आहे. हा कलाप्रकार अनेक भारतीय चित्रपटांतून दाखवण्यात आला आहे, असे क्रिएटिव्ह हेव्हनचे संचालक ली दॅझाँग यांनी सांगितले. बीजिंग आणि दिल्ली राजदूत कार्यालयाकडून शो च्या आयोजनासाठी सहकार्य मिळाले असल्याची माहिती आयोजक आर्य कार्निव्हल्सचे सीईओ दीपक बहल यांनी दिली.

तरुण भिक्खूची कथा : ‘द लिजेंड ऑ फ कुंग फू’मध्ये तरुण भिक्खूची कथा सांगण्यात आली आहे. शोच्या माध्यमातून चुन यी नावाच्या भिक्खूची गोष्ट मांडण्यात आली आहे. कुंग फूची साधना करून शारीरिक, आध्यात्मिक आव्हानांचा कसा मुकाबला करतात. त्यासाठी ते संगीत, नृत्याचा सराव कसा करतात. हे दर्शविण्यात आले.

पाच वर्षांचा करार
क्रिएटिव्ह हेव्हन आणि आर्य कार्निव्हल यांच्यात पाच वर्षांचा करार झाला आहे. या कालावधीत ते देशातील विविध शहरांत शो प्रदर्शित करणार आहेत.
5000 परफॉर्मन्सेस
द लिजेंड ऑ फ कुंग फू हा शो जपान, रशिया, कॅनडा, ब्रिटन, स्पेन, अमेरिकेसह जगभरात 5 हजार वेळा सादर करण्यात आला आहे.