आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Clean Chit To Rajiv Gandhi On Bhopal Gas Tragedy

'भोपाळ गॅसकांडाशी राजीव गांधींचा संबंध नाही, राव होते गुन्‍हेगार'

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः भोपाळ वायूकांडाप्रकरणी जनतेचे खरे दोषी माजी पंतप्रधान व तत्‍कालीन केंद्रीय गृहमंत्री स्‍व. पी. व्‍ही. नरसिंह राव हे होते, असा दावा मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री स्‍व. अर्जून सिंह यांनी त्‍यांच्‍या आत्‍मकथेतून केला आहे. या संपूर्ण प्रकरणाशी तत्‍कालीन पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचा काहीही संबंध नव्‍हता. असेही स्‍व. सिंह यांनी आत्‍मकथेतून म्‍हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते अजूर्न सिंह यांचे 4 मार्च 2011 रोजी निधन झाले. त्‍यांनी आत्‍मकथा लिहीली होती. ती आता पुस्‍तक स्‍वरुपात येणार आहे. 'ए ग्रेन ऑफ सँड इद द अवरग्‍लास ऑफ टाईम' असे या पुस्‍तकाचे नाव आहे. अजूर्न सिंह यांनी त्‍यात म्‍हटले आहे की, ''वॉरेन एंडरसनच्‍या भोपाळमध्‍ये येण्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांच्‍या अटकेचे लेखी आदेश मी दिले होते. त्‍यानंतर मध्‍य प्रदेशचे तत्‍कालीन मुख्‍य सचिव ब्रह्मस्‍वरुप आणि वरिष्‍ठ पोलिस अधिका-यांना दिल्‍लीतून दूरध्‍वनीवरुन संपर्क साधण्‍यात आला होता. एंडरसनला जामीन सुनिश्चित करण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले होते. त्‍यावेळी मी राजीव गांधी यांच्‍यासोबत दौ-यावर होते. त्‍यांना एंडरसनच्‍या अटकेबद्दल माहिती दिली. त्‍यांनी माझे म्‍हणणे ऐकून घेतले. परंतु, कोणतीही टिप्‍पणी केली नाही. मुख्‍य सचिवांना मी निर्देश देऊन एंडरसनच्‍या अटकेची नोंद झाली पाहिजे, असे सांगितले.
राजीव गांधी यांनी या मुद्यावरुन माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही किंवा एंडरसनची बाजू घेऊन मला काही सांगितले. नरसिंह राव यांच्‍या सांगण्‍यावरुन ब्रह्मस्‍वरुप यांना दुरध्‍वनी करण्‍यात आला होता, हे मला नंतर कळले.''
भोपाळ वायुगळती: २६ वर्षांपासून हक्काचा लढा