आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा घोटाळा प्रकरण: धाडींची माहिती लीक, सीबीआय तपास करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोळसा ब्लॉक वाटप घोटाळ्याशी संबंधित धाडी घालण्याची गोपनीय माहिती आधीच लीक झाल्याप्रकरणी सीबीआय तपास करणार आहे. याप्रकरणी धाडी टाकण्यापूर्वी संबंधित कंपन्यांना त्याची माहिती आधीच मिळाली होती अशी तक्रार होती. लखनऊ मध्ये आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडे (सीव्हीसी) तक्रार केली होती. कोळसा ब्लॉक वाटपप्रकरणी गेल्या सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.3 सप्टेंबर 2012 रोजी सीबीआयने देशभरात 30 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.सीबीआयच्या कारवाईचा कंपन्यांना आधीच सुगावा लागला होता असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला होता.ठाकूर यांनी या आरोपानंतर सीव्हीसीला पत्र पाठवून तक्रार केली होती. तिथून ती चिठ्ठी सीबीआयला पाठवण्यात आली.