आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्‍ये थंडीने मोडला 100 वर्षांचा विक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः उत्तरेकडे सुरु असलेल्‍या बर्फवृष्‍टीमुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. परंतु, दक्षिणेकडेही थंडीची लाट आली असून आंध्र प्रदेशमध्‍ये थंडीमुळे 8 जणांचा मृत्‍यू झाला आहे. कर्नाटकमध्‍ये तर थंडीने 100 वर्षांचा विक्रम मोडला आहे. बेळगावमध्‍ये 7.2 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविण्‍यात आले आहे. तर बंगळुरुमध्‍येही 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
आंध्र प्रदेशच्‍या उत्तर तेलंगणा भागात गुंटुर जिल्‍ह्यामध्‍ये 4 वृद्धांचा थंडीमुळे मृत्‍यू झाला. तर बापटाला आणि विशाखापट्टणम जिल्‍ह्यात 2-2 महिलांचा मृत्‍यू झाला आहे. थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्‍याचा अंदाज व्‍यक्त करण्‍यात आला आहे.
हिमाचल प्रदेश आणि काश्मिरमध्‍ये काही दिवसांपुर्वी तुफान बर्फवृष्‍टी झाली होती. सध्‍या अधूनमधून तुरळक बर्फवृष्‍टी होत आहे. त्‍यामुळे उत्तर भारत गारठला आहे. राजधानी दिल्‍लीत आज 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्‍यात आले आहे. कडाक्‍याची थंडी आणि दाट धुक्‍यामुळे रेल्‍वे आणि विमानसेवेवर परिणाम झाला आहे. सुमारे 24 रेल्‍वे गाड्या उशीरा सोडण्‍यात आल्‍या. तर अनेक विमानांनाही विलंब झाला. मुंबई, हावडा तसेच दक्षिणकेडे जाणा-या गाड्या विलंबाने धावत आहेत. मध्‍य भारतातही थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्‍या खाली नोंदविण्‍यात आले.
उत्तर भारतात थंडीची लाट, पाहा फोटो
थंडीची लाट; पारा शून्याच्या खाली