आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cold Winds From Pakistan May Increase Cold In India

पाकिस्‍तानमुळे वाढणार भारतात थंडी, उत्तर भारतात बर्फवृष्‍टीसह गारपीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पुढील आठवड्यात आणखी एक थंडीची लाट येण्‍याची शक्‍यता आहे. वेस्‍टर्न डिस्‍टर्बन्‍स सक्रीय झाल्‍यामुळे जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये बर्फवृष्‍टी झाली. तर देशाच्‍या उत्तरेकडील मैदानी भागात काही ठिकाणी पावसासह गारपीटही झाली. त्‍यामुळे थंडी वाढली आहे. वाढलेल्‍या थंडीतही पाकिस्‍तानचा 'हात' असल्‍याचे हवामान तज्ञांचे मत आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पाकिस्‍तान आणि अफगाणिस्‍तानकडून थंड वारे भारताच्‍या दिशेने आल्‍यामुळे थंडी परतली आहे. जम्‍मू आणि काश्मिरमध्‍ये बर्फवृष्‍टी झाल्‍यामुळे राजस्‍थान, हरियाणा, पंजाब, उत्तरप्रदेशचा काही भाग तसेच मध्‍य प्रदेशमध्‍ये वातावरण बदलले. या भागात काही ठिकाणी पावसासाह गारपीट झाली. दिल्‍लीसह जयपूर, ग्‍वाल्‍हेर, इत्‍यादी भागात गारा पडल्‍या. त्‍यामुळे काही दिवसांमध्‍ये थंडीची लाट येऊ शकते. याचा प्रभाव मध्‍य महाराष्‍ट्र, विदर्भात जाणवू शकतो.

(फोटोः जयपूरमध्‍ये मैदानी भागात पडलेल्‍या गारा)